Home विदर्भ स्व. अशोकभाऊ डोहे मित्र परिवारातर्फे गरजू ना किराणा किटचे वाटप

स्व. अशोकभाऊ डोहे मित्र परिवारातर्फे गरजू ना किराणा किटचे वाटप

255
0

कोरपना – मनोज गोरे

संपूर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असल्याने देशात व राज्यात कोरोना या विषाणूवर आळा घालण्यासाठी शासनाने लोकडाऊनचे पाऊल उचलले आहे.त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटूंबावर दोन वेळाचे पोट भरण्याचे संकट निर्माण झाले आहे, त्याकरिता एक अल्पशी मदत म्हणून कोरपना नगरीतील गरजूंना स्व. अशोकभाऊ डोहे मित्र परिवार च्या वतीने दि २१ एप्रिल रोज मंगळवार ला किराणा किट वाटप करण्यात आले आहे. यावेळी भारतभाऊ चन्ने ,नगरसेवक सुभाष तुराणकर, नगरसेवक अमोल आसेकर,विजय पानघाटे , सुनील देरकर, अड पवन मोहितकर, पद्माकर दगडी, अतुल आसेकर अभय डोहे, विलास धोटे, रमेश डाखरे,विठ्ठल तुमराम,जितेंद्र पिपळकर, आदी उपस्थित होते.