Home विदर्भ जिवती तालुक्यात 110 गावात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी

जिवती तालुक्यात 110 गावात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी

79
0

तहसिलदार प्रशांत बेडसे यांची संकल्पना आरोग्य तपासणीसाठी सात पथक

जिवती – मनोज गोरे

जिवती – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर विविध उपाययोजना आखण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून अतिदूर्गम असलेल्या तालुक्यातील नागरिकांची गावातच आरोग्य तपासणी व्हावी यासाठी जिवतीचे तहसिलदार प्रशांत बेडसे पाटिल यांनी ‘डाॕक्टर आपल्या दारी’हा उपक्रम सुरू केला आहे.हि आरोग्य तपासणी तालुक्यातील 110 गावात केली जाणार असुन यासाठी सात आरोग्य पथक तयार करण्यात आले आहे.या पथकात अनुभवी डाॕक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती केली गेली असुन नागरिकांची आरोग्यासाठी होणारी फरपट आता थांबणार आहे.
चंद्पूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा लागून आहे.सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरा असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत होता.हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदार यांनी जिल्हा परिषद शाळेतील 105 शिक्षकांना पोलिस मिञ बनवून कोरोनाची खबरदारी म्हणून त्यांना सिमेवर तैणात करण्यात आले आहे.वातावरणातील बदलामुळे पहाडावर सर्दी,खोकला,ताप,व अंगदुखीसारखे आजार नित्याचेच आहेत.माञ सध्या कोरोना विषाणुजन्य आजाराची दहशत वाढल्यामुळे नागरीकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करित आहे.हि बाब जिवती तहसिलदाराने लक्षात घेऊन त्यांनी ‘ डाॕक्टर आपल्या दारी ‘ हा उपक्रम सुरू केला आहे.जिवती तालुक्यातील 110 गावात हि आरोग्य तपासणी केली जाणार आहे.गावातच अनुभवी डाॕक्टर व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर उपचार होणार असल्याने नागरिकांना होणारा ये-जा करण्याचा ञास आणि आर्थिक भुर्दंडही वाचणार आहे.आरोग्य तपासणीसाठी नियुक्ती केलेल्या पथकात वैद्यकीय अधिकारी डाॕ.आर.पी.अनखाडे,डाॕ.मिलिंद वानखेडे,डाॕ.अंकुश गोतावळे,डाॕ.राजेंद्र अहिरकर,डाॕ.अर्चना तेलरांधे,डाॕ.कविता शर्मा,डाॕ.आबिद शेख, व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार असुन ग्रामपंचायत निहाय त्या-त्या गावात जाऊन आरोग्य चमू नागरिकांची तपासणी करणार आहे.

गेल्या काही दिवसापासून पहाडावर विविध आजाराने थैमान घातल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.यामुळे जिवती आणि पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती हि गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
– तहसिलदार
प्रशांत बेडसे पाटिल
जिवती