Home उत्तर महाराष्ट्र नासिक जिल्हातील शेतकर्याच्या हक्काचे पाणी

नासिक जिल्हातील शेतकर्याच्या हक्काचे पाणी

55
0

नाशिक – जिल्ह्यात धरणे मात्र पाण्यावर नगरकरांचा व मराठवाड्याचा अधिकार याबाबत मी त्यावेळेस कठोर भूमिका घेतल्यामुळे आळंदी धरणातील तसेच गंगापूर धरणातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून दिले. मात्र मी श्रेय घेण्याबाबत कायमच दूर राहिलो .परंतु त्यावेळेस मी जर कठोर भूमिका घेऊन कागदोपत्री व मंत्रालयात पाठपुरावा करून हे जर केले नसते तर आज परिस्थिती कायमच टंचाईसदृश परिस्थितीशी सामना करावा लागला असता.
त्यावेळी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षाच्या कालावधीत काँग्रेस सरकारने व या सरकारमधील नगर व मराठवाडाधार्जिण्या मंत्र्यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांच्या हक्काचे पाणी देण्यासाठी कायमच सापत्न वागणूक दिली हे मला पत्रकारितेच्या माध्यमातून कळाले .याबाबत मी संबंधित विभागांशी संपर्क साधून अधिकाऱ्यांशी चांगली मैत्री जमवली व गंगापूर तसेच आळंदी धरणातील शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी कुठे जाते याबाबत कागदपत्रे सर्व पुरावे जमवून त्याबाबत दैनिक गांवकरीत सातत्याने लिखाण केले त्यावेळेस बातमी झळकली की अनेक अधिकारी व नेते कार्यकर्ते शेतकरी यांचे फोन मला माझ्या घरी लँडलाईन वरती येत असत. व ते फोन माझी आई उचलत असे
सकाळी घराच्या बाहेर पडत असे आई-वडील भाऊ सातत्याने माझ्यावर रागवत असत उठला की सुटला नाशिकला काय तुझे काम आहे .जेवण करत नसल्यामुळे सर्वच रागवत असत माझ्यावरती मी उपाशीच नाशिकला निघत असे. व याबाबत सातत्याने माहिती घेऊन लिखाण करत असे.

१९९५-९६ ला मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते व राज्याचे समाज कल्याण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री बबनराव घोलप(नाना) यांची त्यावेळेस सातत्याने भेटी घेऊन नाशिक जिल्ह्यातील पाण्याबाबत आळंदि धरणातील इतर पाण्याचे आरक्षण उठवणे बाबत त्यांचेकडे व अधीक्षक अभियंता देशमुख साहेब व जिल्हाधिकारी भालचंद्र वीर यांच्याकडे निवेदने त्यावेळी देऊन व त्याबाबत दैनिक गांवकरी मध्ये सातत्याने बातम्या देऊन आळंदी धरणातील ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण उठवले कारण हे पाणी नदीपात्रा द्वारे तसेच पुढे एक्सप्रेस कँनल द्वारे नगर व मराठवाड्याकडे जात होते. ते जाणे पूर्ण बंद झाले व हे मुबलक पाणी शेतकऱ्यांसाठी मिळू लागले त्यामुळे त्यावेळी आळंदी धरणा वरती त्यावेळेस पालक मंत्री घोलप नाना यांच्या हस्ते जल पूजनाचा कार्यक्रम आहे मोठ्या धुमधडाक्यात केला. या कार्यक्रमाच्या पुरोहित्य मखमलाबाद येथील आंध्रुटकर शास्त्री यांनी केले होते. ते फार विनोदी होते त्यावेळेस आडगाव खेरवाडी सय्यद पिंपरी व त्या भागातील शेतकऱ्यांनी माझी पाठ थोपटली सन्मान केला परंतु मी त्याबाबत कधीही श्रेय घेतले नाही व स्वता उपाशी राहूनच व पायी फिरुन प्रवास केला नाशिक ,दिंडोरी ,निफाड ,या तालुक्यातील दुष्काळी कोरडवाहू दुष्काळी भागातील सुमारे सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी कायमच मोठ्या प्रमाणात लाभ झाला .परंतु मी याबाबत कायमच कोरडा राहिलो व खस्ताही भरपूर खाल्ल्या

९५५२८८३१९७ – सुरेश भोर

Unlimited Reseller Hosting