Home राष्ट्रीय कोरोना : महामारी अध्यादेशास राष्ट्रपतींची मान्यता

कोरोना : महामारी अध्यादेशास राष्ट्रपतींची मान्यता

194

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यासंदभात मोदी सरकारच्या अध्यादेशास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी मान्यता दिली. आजपासून या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होणार आहे. हा अध्यादेश लागू झाल्यामुळे देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. या प्रकरणात ३० दिवसात तपास पूर्ण करण्यात येईल. तर दोषी असणाऱ्या व्यक्तींना एका वर्षाची शिक्षा होईल.लॉकडाऊन दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बुधवारी बंदचा इशारा दिला होता. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी हा निर्णय मागे घेतला.या आध्यदेशाला मंजुरी दिल्यामुळे दोषींची चौकशी ३० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. तर एका वर्षाच्या आत या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. या कायद्यात ३ महिन्यापासून ते ५ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याला ५० हजारांपासून २ लाखांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. प्रकरण जर गंभीर असले तर ७ वर्षापर्यंत या कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.