Home महाराष्ट्र मिशन आयएएस….!

मिशन आयएएस….!

174

सनदी अधिकारी हा एक सक्षम अधिकारी म्हणून राज्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार स्तंभ असतो. केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून जे उमेदवार निवडले जातात त्यांची अधिकारी पदासाठी निवड केली जाते. ही गरुड झेप घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी चिकाटीने ध्येय साध्य करीतच पुढे जात असतो. परंतु आड येते ती गरिबी.त्यामुळे तो स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे खर्चिक खाजगी वर्ग/ मार्गदर्शन घेण्यासाठी धजावत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी मिशन आयएएस झटत आहेंत. मिशन आयएएस हा उपक्रम प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.स्थापनेपासून ते या मिशनची अहोरात्र परिश्रम घेत आहेंत.स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी काठोळे सरांनी अमरावती येथील त्यांचा बंगला उपलब्ध करून दिला आहे.
युवकांना सर्वच क्षेत्रात सक्षम करण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या मिशनचे कार्य देशव्यापी होत आहे, यावरून त्याचे महत्त्व स्पष्ट होते .
मिशन आयएएसची स्थापना १२ मे२००० रोजी यवतमाळ जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे विद्यमान प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्याहस्ते अमरावती येथे करण्यात आली.

मिशन आयएएस वीस वर्षांपासून देशभर कार्यशाळा, चर्चा सत्रे,विविध प्रकारचे उपक्रम याद्वारे स्पर्धा परीक्षेची जनजागृती यशस्वीरित्या कार्यरत आहे. या संपूर्ण कालावधीत मिशन आय ए एस च्या उपक्रमांना देशामधील विविध उच्च पदावर कार्यरत असलेल्या
जवळपास २०० आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेंच आयएफएस सनदी, राजपत्रित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपले बहुमूल्य मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना अधिक झाला. त्यामुळे त्यांचयमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. युवकांना सर्वच क्षेत्रात सक्षम करण्यासाठी

मिशन आयएएसने विद्यार्थ्यांमध्ये गतिमानता आणण्याच्या दृष्टीने त्यांना तत्पर, तेजस्वी बनविण्याचा संकल्प सोडला आहे. मुलांचे व्यक्तिमत्व हे बालवयातच घडू लागते. त्यामुळे मिशन आयएएसने दुसऱ्या वर्गापासूनच जो लातूरच्या संस्कार प्रकाशनाचा प्रकल्प आहे त्या धर्तीवर विद्यार्थ्यांना आयएएसचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. हे प्रशिक्षण ज्युनिअर आयएएस या नावाने ओळखले जाते. या उपक्रमाला ग्रामीण तथा शहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहें. केवळ एक रुपया प्रती दिन एवढ्या नाममात्र दरामध्ये हे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये मुलांना त्या त्या वर्गाची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात. त्यांची या अभ्यासक्रमानुसार परीक्षाही घेतली जाते. मिशनने आजवर ७५ प्रेरणादायी पुस्तके प्रकाशित केली आहेत. अजून काही प्रकाशित करण्यात येणार आहेत.
विनामूल्य कोचिंग.
दिल्लीच्या ‘मालूका आयएएस ‘ह्या कोचिंग क्लासचा आयएएस पूर्व परीक्षेचा निकाल १००% आहे. या अकादमीचे संचालक श्री लक्ष्मण मालुका यांनी सामाजिक बांधिलकीतुन मिशन आयएएसमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयएएसचे कोचिंग विनामूल्य देणे सुरू केले आहे. त्याचा लाभ आज मोठ्या प्रमाणात होत आहे.
हेल्पलाइन
मिशन आयएएसचे हेल्पलाईन क्रमांक 9890967003, 9890744160 असे आहेत. या क्रमांकावर मिशन आयएएसचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे हे स्वतः उपलब्ध असतात.
स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या क्रमांकावरून दिली जातात.
मिशन आयएएस या चळवळीचा व्याप महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही वाढत आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश ,झारखंड, छत्तीसगड ,बिहार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड या राज्यातही मिशन आयएएसने विविध उपक्रम घेतलेले आहेत.त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत असतो.
मिशन आयएएसचे कार्यालयीन संपर्क खालील प्रमाणे आहेंत. 1)दिल्ली – श्री. लक्ष्मण मालुका, मालुका आय ए एस , 53/6, हॉटेल मोडोनाजवळ, जुने राजेंद्र नगर मेन मार्केट, नवी दिल्ली 110060. भ्रमणध्वनी :9910133084.
2) मुंबई – श्री देवेंद्र भुजबळ, राज्य समन्वयक, मिशन आय ए एस, A 1101, बिल्डिंग नं 70, टिळक नगर चेंबूर, मुंबई 400079. भ्रमणध्वनी:9869484800.ईमेल: devendrabhujbal4760@gmail.com
3)अमरावती -प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 8, माय, जिजाऊ नगर, विद्यापीठ रोड, महापौर बंगल्यासमोर अमरावती. महाराष्ट्र. भ्रमणध्वनी 9890967003, 9890744160.
मिशन आयएएसच्या उपक्रमाविषयी आपल्या सूचना आपण उपरोक्त क्रमांकावर व्हाट्सएपद्वारे कळविल्यास त्यांचं स्वागत आहे.
– रवींद्र दांडगे .
9404545238