Home मराठवाडा नांदेड मनपा क्षेत्रातील कन्टेनमेंट झोन मधील १३ हजार ३०९ व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे...

नांदेड मनपा क्षेत्रातील कन्टेनमेंट झोन मधील १३ हजार ३०९ व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे तपासणी

188

नांदेड, दि. 23 ( राजेश भांगे ) – नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका क्षेत्रातील पिरबुऱ्हाण नगर व लगतचा परिसर कन्टेनमेंट झोन मधील एकुण ३ हजार ७९ घरांमधील १३ हजार ३०९ व्यक्तींची थर्मल मशीन द्वारे तपासणी करण्यात आली. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन मनपा च्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

महानगर पालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शना खाली मनपा उपआयुक्त (आरोग्य) अजिपाल सिंघ संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. बदीयोद्दीन, डॉ. बळीराम भुरके, डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ. कल्याण पवार, आरोग्य पर्यवेक्षक, ४० आशा वर्कर आणि ४० परिचारिका यांनी कन्टेनमेंट झोन मध्ये नागरिकांची तपासणी केली.

पिरबुऱ्हाणनगर येथील एका ६४ वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर इ. परिसर हा कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना बाधीत व्यक्तीच्या परिवारातील ८ सदस्यांना आरएनआय निवास येथे आज दाखल करण्यात आले.

Previous articleअक्कलकोट तालुक्यात तीन दिवस जनता कर्फ्यू
Next articleमिशन आयएएस….!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.