Home सोलापुर अक्कलकोट तालुक्यात तीन दिवस जनता कर्फ्यू

अक्कलकोट तालुक्यात तीन दिवस जनता कर्फ्यू

66
0

शुक्रवार ता.२४ एप्रिल ते रविवार ता.२६ एप्रिल

वागदरी /नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – तालुक्यात कोरोनाचा अजिबात शिरकावच होऊ नये यासाठी तहसिलदार अंजली मरोड यांनी नागरिकांना शुक्रवार ता.२४ एप्रिल ते रविवार ता.२६ एप्रिल या तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांच्या हितासाठीच असलेल्या या कालावधीसाठी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीचा जनता कर्फ्यू पाळावा तसेच कुणीही या कालावधीत घराबाहेर पडू नयेत.या कालावधीत फक्त मेडिकल दुकाने चालू राहतील आणि इतर कोणतेही व्यवहार चालू राहणार नाहीत याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावेत असे आवाहन मरोड मॅडम यांनी केले आहे.