Home विदर्भ डॉक्टरांनी स्वत:सोबतच कर्मचा-यांची काळजी घ्यावी – पालकमंत्री सुनील केदार

डॉक्टरांनी स्वत:सोबतच कर्मचा-यांची काळजी घ्यावी – पालकमंत्री सुनील केदार

108
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

रिक्तपदाची जाणून घेतली माहिती

वर्धा, दि 23 :- सध्या कोरोना विषाणू प्रार्दुभाव जगात व भारतसह राज्यात सुरु आहे. जिल्हयात कोरोना विषाणू बाधिताची संख्या एकही नसल्यामुळे वर्धा जिल्हा कोरोना मुक्त आहे. परंतु कोरोना बाधित जिल्हयातून आलेल्या नागरिकामुळे जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोना बाधित जिल्हयातून आलेल्या नागरिकांची तपासणी करतांना डॉक्टरांनी स्वत:ची काळजी घेण्यासोबतच प्राथमिक आरोग्य केद्रातील सर्व कर्मचा-याची काळजी घेण्याच्या सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिल्यात.
आज जिल्हयातील कन्नमवार, साहूर, रोहणा, मांडगाव, समुद्रपूर व वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती मृनाल माटे, उपविभागी अधिकारी हरीष धार्मिक, तहसिलदार सचिन कुमावत, गटविकास अधिकारी श्री. नंदगवळी, कन्नमवारचे सरपंच शंकर निकोसे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. रंगारी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मदन चाफे यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. केदार यांनी वैद्यकिय अधिकां-याकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर, मास्क, औषधी साठा याची पाहणी केली. तसेच आरोग्य केद्रात असलेली रुग्णवाहिका सुस्थितीत असल्याची त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असल्याची खात्री केली . वाहन चालक आणि कर्मचा-याची पदे पूर्ण प्रमाणात भरली असल्याची माहिती जाणून घेतली.
दैनंदिन बाहय रुग्णाची नोंदणी व आता लॉक डाऊनच्या कालावधित किती बाहय रुग्णाची सरासरी नोंदणी होत आहे याची माहिती श्री. केदार यांनी जाणून घेतली. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. चाफे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भांडार रुमची आवश्यकता असल्याची मागणी पालकमंत्री श्री. केदार यांचे कडे केली. रोहना येथे श्री केदार यांनी उपविभागीय अधिकारी श्री. धार्मिक यांना जिल्हयातील एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी राशन कार्डसाठी नोंदणी केलेल्या व कागदपत्राची पुर्तता केलेल्या नागरिकांना तात्काळ राशन कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्यात.
रोहना येथे उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसिलदार श्री. चव्हाण, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. झोपाटे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कुरवाडे यांची उपस्थिती होती.