Home उत्तर महाराष्ट्र कोरोनाच्या लॉकडावुनच्या काळातही दारू विक्रीसाठी केला बेकायदेशीर साठा – २४.३९ लाखांची बिअर...

कोरोनाच्या लॉकडावुनच्या काळातही दारू विक्रीसाठी केला बेकायदेशीर साठा – २४.३९ लाखांची बिअर , वाईन जप्त

49
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भागे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढण्यात आली आहे. असे असताना बेकायदेशीर रीत्या दारू विक्री करण्यासाठी केलेला साठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई अहमदनगर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने केली. या कारवाईत तब्बल २४ लाख ३९ हजार ७२ रुपयांची विविध कंपन्यांची वाईन व बिअर जप्त करण्यात आली आहे.

लॉकडाऊनचा फटका व्यसनींनाही बसला आहे. कोरोनाच्या संकटात तलफ भागवण्यासाठी अनेकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा लोकांवर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके लक्ष ठेवून आहेत. शोध मोहीम सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर पथकाला बेकायदेशीररीत्या दारू विकण्यासाठी दारूसाठा केल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क पथकाने निमगाव को-होळे, ता. राहाता येथे योगेश कडलग याच्या मालकीच्या पत्राशेडवर धाड टाकली. त्या शेडमध्ये १७ नामांकित कंपनींच्या बिअर व वाईन्सचे ९६४ बॉक्स आढळून आले. या दारूची एकूण किंमत २४ लाख ३९ हजार ७२ रुपये आहे.
या प्रकरणी सुरेश मुकेश मुजमुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई), ८०(१), ८३ नुसरर गुन्हा दाखल करून आरोपी योगेश कडलग याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव १ चे दुय्यम निरीक्षक अजित बडदे करत आहेत.

सदर गुन्हा अहमदनदरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , पुणे विभागाचे विभागिय उपायुक्त प्रसादजी सुर्वे , राज्य उत्पादन शुल्क अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विभागाचे निरीक्षक बी. टी. घोरतळे, निरीक्षक संजय सराफ, श्रीरामपूर भरारी पथकाचे निरीक्षक अनिल पाटील, कोपरगावचे दुय्यम निरीक्षक अजित बडदे, धवल गोलेकर, पी. बी. आहेरराव, कैलास क्षेत्रे, जवान निहाल हुके, भाऊसाहेब भोर, निहाल शेख, राजेंद्र कदम, विकास कंठाळे, प्रवीण साळवे, पांडुरंग गडादे आदी पथकाने उघडकीस आणला.