Home मराठवाडा शासनाचे नियम पाळा, दंड टाळा : कारवाईसाठी पथकाची स्थापना ,

शासनाचे नियम पाळा, दंड टाळा : कारवाईसाठी पथकाची स्थापना ,

45
0

सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग बंधनकारक

गणेश महाडिक, डॉ. विपीन पाटील, अरविंद मुंडे, हेमंत कदम, बाळासाहेब पवार

बीड/परळी वैजनाथ /अँड शेख ताज अहेमद अन्सारी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्ह्यात

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४(१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. सार्वजनिक स्थळी धुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे गरजेचे असल्याने याबाबीचे पालन व्हावे याकरीता गैरकृत्य करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळून होणारा दंड टाळावा आणि सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.
सार्वजनिक स्थळी व शासकीय कार्यालय मध्ये या गैरकृत्य व प्रकार आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगर परिषद व ग्रामपंचायतीने तर शासकीय कार्यालय क्षेत्रामध्ये संबधित शासकीय विभाग प्रमुख कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक स्थळी जसे रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी थुंकल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असून रक्कम १०००/- दंड करण्यात येईल. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे पुर्ण झाकलेले नसणे यासाठी रू. ५००/- दंड करण्यात येईल.
दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते सर्व जिवनाश्यक वस्तू विक्रेते इत्यादी ठिकाणी ग्राहक यांनी सोशल डिस्टसिंग न राखणे. (२ ग्राहकामध्ये कमीत कमी ३ फुट अंतर न राखणे. विक्रेत्याने मार्कींग न करणे) रु. २०००/- दंड त्या आस्थपनाचे मालक, दुकानदार, विक्रेता यांना करण्यात येणार आहे. तर २००रुपये दंड संबंधित व्यक्ती अथवा ग्राहक यांना करण्यात येणार आहे.
किराणा व जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास रु. ५०००/- दंड करण्यात येईल. सार्वजनिक स्थळी (रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इ.ठिकाणी) एखादी व्यक्ती अंदाजे १८ वर्षापेक्षा कमी किंवा अंदाजे ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत आढळून आल्यास रक्कम १०००/- रूपये दंड करण्यात येईल.
एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तिक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा इ. घेवून
जात असल्यास रक्कम १०००/- रूपये दंड करण्यात येईल. संबंधित व्यक्ती अथवा आस्थापना यांनी दुसर्‍यांदा केल्याचे दिसून आल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
सदर गैरप्रकार रोखण्यासाठी पथक तयार करण्यात आले असुन ते अधिकारी कर्मचारी या कृत्यांचे फोटोग्राफी अथवा व्हिडीओग्राफी करणार आहेत. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद नगरपालिका व ग्रामपंचायत अधिनियम या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभागाची मदत घेणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, भादंवि १८६०(४५) चे कलम १८८ आणि महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना नियम २०२० नुसार दोषी व्यक्ती शिक्षा व कारवाईस पात्र राहणार आहे.
नागरीकांनी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावेत आणि होणारा दंड, अपमान टाळावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.

भरारी पथकाची स्थापना, जाग्यावरच करणार दंड

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आॅन दी स्पाॅट कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात, पो. काॅ. मुजमुले, टाकरस, नगर परिषदेचे दत्तात्रय देशमुख, शेख जमील शेख हुसेन, अजयकुमार कलंत्री, दिलिप गुट्टे आदींसह एक फोटो ग्राफर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आॅन दी स्पाॅट कारवाई करणार आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Unlimited Reseller Hosting