Home मुंबई आमदार योगेश सागर यांच्या कडून त्या वृत्ताची दखल गरिबांना राशन वाटप

आमदार योगेश सागर यांच्या कडून त्या वृत्ताची दखल गरिबांना राशन वाटप

48
0

सुरेश वाघमारे

मुंबई – दिनांक १३.४.२०२०रोजी चारकोप विधानसभेतील गोरगरीब जनता हवालदिल : हॅलो आमदारसाहेब इकडे लक्ष द्याल का ? या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच भाजप गोटात हलचल निर्माण झाली सर्वत्र सोशल मीडियात बातमी व्हायरल झालतंनन्तर भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा सचिव योगेश पडवळ यांनी आमचे प्रतिनिधी सुरेश वाघमारे याना फोन करून बातमीबाबत खुलासा केला आम्ही रोज ७०० जवळ लोकांना रेशन खिचडी वाटपण करत असून आपण छापलेल्या बातमी ची दखल आमदारसाहेबानी घेतली असून लवकरच त्या दिलेल्या गरजूना रेशन मदत दिली जाईल असे पडवळ यांनी सांगितले व संध्याकाळपर्यँत विलास हिवाळे याना तात्काळ मदत मिळाली असल्याचे हिवाळे यांनी सांगितले दादाभाऊ माने याना सुद्धा गटई कामगारांसाठी रेशन २०० खिचडीचे पाकीट मिळाले व रेशन सुद्धा देणार असल्याचे समजले” साप्ताहिक पोलिसवाला वृत्ताची दखल घेण्यात अली असून माजी मंत्री आमदार योगेश सागर यांनी या विभागात गेल्या पंधरा वर्षात विकास कामे केली असून अनावधानाने या लोकांना मदत मिळू शकली नाही मात्र कुणीही उपाशी राहणार नाही असे आमदार सागर यांच्यावतीने त्याचे निकटवर्तीय योगेश पडवळ यांनी वार्तालाप करतेवेळी बोलले . बाकीच्यांना जेवढ्या लवकर शक्य होईन तेव्हड्या लवकर तातडीने रेशन वाटप करण्यात येईल असे सांगण्यात आले . चारकोप गाव मध्ये डिंगेश्वरी मंदिर जवळील झोपड्यात गरजूना रेशन प्रतीक्षा संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही आमदार साहेबांच्या वतीने हि गोरगरिबांना वाटप करीत असल्याचे स्थनिक भाजप कर्यकर्ते प्रदीप धुमक यांनी सुद्धा कॉल करून सांगितले भाजप नगरसेवक बाळा तावडे यांच्या हस्ते आज प्रतिक्षा संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून व श्री. मयुर सालुंके, श्री सूर्यनारायण चौरसिया, श्री दिलिप दिक्षित, रिद्धी गोल्ड, श्री भिमराव सोनकांबले, श्री शेखर अन्ना, श्री महेंद्र सोढी व श्री महेंद्र राजपूत यांच्या सहकार्याने चारकोप गाव येथिल ८०० गरजू , कष्टकरी , कामगार यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. अन्यायाविरुद्ध आणि कुणाचाही कोरोनामुळे भूकबळी जाऊ नये यासाठी आमची लेखणी जराही न डगमगता .सत्य मांडण्यास .”बंदुकीच्या गोळीने व तलवारीच्या धाकाने कधीही थांबणार नाही “अन्याविरुद्ध लिहिण्यास आम्हास कुणीही बिनदिक्तपणे आपल्या समस्या साप्ताहिक पोलिसवाला , पोलीसवाला ऑनलाइन मिडिया कडे आवाहन करण्यात येत आहे .

Unlimited Reseller Hosting