Home उत्तर महाराष्ट्र गडकिल्ले हेच मूर्तिमंत शिवराय  ते वाचवा , “शिवजयंतीनिमित्त राम...

गडकिल्ले हेच मूर्तिमंत शिवराय  ते वाचवा , “शिवजयंतीनिमित्त राम खुर्दळ यांचे आवाहन”

249

नाशिक , दि. २० :- गडकिल्ले छत्रपती शिवराय,युवराज शंभूराजे व मावळ्यांच्या शौर्य पराक्रमाचे साक्षीदार आहेत.सध्या गडकोट पडक्या , भग्न , दुर्लक्षित अवस्थेत आहे.

दुर्गसंवर्धन संस्थांच्या अथक परीश्रमाणे ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत,समजत आहे.गडकोटांना सामर्थ्य मिळवून देणारे गडकोट हेच आजच्या काळात मूर्तिमंत शिवराय आहेत त्यांचे अस्तित्व वाचवा असे आवाहन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक दुर्गव्याख्याते राम खुर्दळ यांनी शिजन्मोत्सवानिमित्त( दि.१८,१९ रोजी)केले.

ते ओझर येथील एच ए एल,सेमिनार हॉल,विंचूर गवळी,वाघेरा(त्रंबक)येथील विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळा,वासाळी गावात आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात त्यांनी विचार मांडले.यानिमित्ताने महाराष्ट्रातील गडकोटांच्या रचना,त्यांचा कार्यकाळ,गडकोटांच्या भूमीत झालेल्या ऐतिहासिक घटना,घडामोडी,गडकोटांचे आज्ञापत्र तेथील पर्यावरण,व सद्यस्थितीत गडकोटांची झालेली पडझड,व गडाच्या अस्तित्वासाठी दुर्गसंवर्धनाची धडपड त्यांनी प्रकर्षाने मांडली,शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या नगरातील,आपल्या वस्तीतील,आपल्या गावातील निराधारांचे आधार बना,शेतकरी,
मजूर,बाराबलुतेदार,महिला व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवा,गावे स्वावलंबी करा,असे आवाहन ही त्यांनी केले,राज्यातील गडकोट,तसेच नाशिक जिल्ह्यातील गडकोटांच्या भूमीत झालेल्या पराक्रमाची तसेच वीरांच्या बलिदानाच्या घटना सांगताना गडकोटांच्या अस्तित्वासाठी प्रत्येकाने दुर्गसंवर्धन संस्थांचे मार्गदर्शन घ्यावे,अभ्यासपूर्ण पद्धत्तीने गडकोट संवर्धन करण्यासाठी आमच्या सोबत दुर्गसंवर्धनासाठी राबायला,किल्ले समजून घ्यायला या असे आवाहन हि त्यांनी शिवजन्मोत्सवात उपस्थित समाजाला केले.
राम खुर्दळ

संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था