Home बुलडाणा ७० वर्षीय शेख वजीर यांचा मधमाश्याच्या हल्यात मुत्यू

७० वर्षीय शेख वजीर यांचा मधमाश्याच्या हल्यात मुत्यू

266

गावावर पसरली शोककळा

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील काकणवाडा बु येथील शेत शिवारात शेख वजीर शेख गफुर ७० वर्षीय वृद्ध शेळ्या चराई साठी गेले होते शेळ्या चराई करतांना आग्या मधमाश्याचा हल्यात गंभीर जखमी झाले होते अकोला येथील शासकिय रुग्णालयात उपचार दरम्यान मुत्यू झाला याबाबत थोडक्यात हकिकत असे कि काकणवाडा येथील गट न 115 शे महेबूब शे गणी यांच्या शेतात दि ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान शेख वजीर शेख गफुर ७० वर्षीय वृद्ध शेळ्या चराई साठी गेले होते शेळ्या चराई करतांना आग्या मधमाश्याचा हल्यात गंभीर जखमी अवस्थेत शेतात पडून होते उशीर होऊन घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता शेतकरी शेख महेबुब यांच्या शेतात गंभीर अवस्थेत मिळून आले तात्काळ नातेवाईकांनी अकोला सर्व उपचार जिल्हा शासकिय रुग्णालय उपचारासाठी हलविले उपचार दरम्यान शेख वजीर शेख गफुर यांचा मुत्यू झाला श्वविच्छेदन झाल्या नंतर स्थानीक कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आले दुदैवी घटनेमुळे काकणवाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले ,सुना, 2 मुली, नातवंडे बराच आप्त परिवार आहे