Home जालना बदनापूरच्या नजाकत सय्यद यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान २०२६’

बदनापूरच्या नजाकत सय्यद यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान २०२६’

71

 

बदनापूर (जि. जालना) येथील वरिष्ठ पत्रकार नजाकत शौकत सय्यद यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान २०२६’ (सीझन II) हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता व माध्यम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया ई-मॅगझिनतर्फे दिला जाणारा हा सन्मान समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. नजाकत सय्यद यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत जनजागृती केली असून, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या सन्मानामुळे बदनापूरसह संपूर्ण जालना जिल्ह्याच्या नावाला नवी उंची मिळाली आहे. त्यांच्या कार्यातून न्याय, समता आणि सामाजिक बांधिलकीचे मूल्य जपले गेले असल्याचे गौरवपर पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या यशाबद्दल नजाकत सय्यद यांचे निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, डॉ. एम. डी. पाथ्रीकर, अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर, विश्वस्त डॉ. एस. एस. शेख, डॉ. नजमा खान, डॉ. झेड. ए. पठाण, डॉ. गणेश गावंडे, डॉ. विजय राजळे, डॉ. शफी शेख, नगराधक्ष्य संतोष पवार, माजी नगराध्यक्ष विलास जरहाड, गटनेते बाबासाहेब करहाळे, ज्येष्ठ नेते अय्युब शेख, वरिष्ठ पत्रकार इलियास खान पठाण, सय्यद रफिक, अनिल सपकाळ, बाबासाहेब बनसोड, कल्याण देवकते, अमृत तारो, डॉ. शहजाद सिद्दीकी, जे. व्ही. शेख, आनंद इंदानी, अक्रम खान पठाणयांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.