Home अमरावती चांदुर रेल्वे तालुक्यामधील धानोरा माल्ही गावात चिमुकल्यांनी केली आगडी – वेगळी शिव...

चांदुर रेल्वे तालुक्यामधील धानोरा माल्ही गावात चिमुकल्यांनी केली आगडी – वेगळी शिव जयंती साजरी

317
अमरावती / चांदुर रेल्वे – रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने धानोरा माल्ही येथील चिमुकल्यांनी मातीपासून किल्ला कोंढाणा तयार करून त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली या चिमुकल्या पासून मोठ्या व्यक्तींना पण अभिमान वाटावा अशी त्यांची महाराजांना मान वंदना दिली आहे.

आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण देशात जंजिरा ३०० वर्षांहून अधिक काळ सिद्दींनी या बेटावर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु अभेद्य तटबंदी आणि भौगोलिक परिस्थितीमुळे हा किल्ला अजिंक्य राहिला. अंत: ३ एप्रिल १९४८ रोजी जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि सिद्दींची सत्ता संपली.
आजही हा किल्ला भारताच्या किनारपट्टीवरील एक अत्यंत भक्कम लष्करी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. त्या किल्ल्यांसाठी
श्रेयस गुणवंत मारबते
आयुष प्रफुल्ल मोहोळ
तुषार देवेंद्र सारवे
मोहीत राजु वाघाडे
सार्थक देवेंद्र सारवे
शोर्य अमोल मारबदे
ओम नारायण नन्नोरे
कृष्णा ऋषिनाथ मारबदे
रुद्र तुकाराम उभोकर
विराज रविंद्र मानकर
देवांशी राजु वाघाडे
प्रिती ओंकार मेश्राम
अर्चना ओंकार मेश्राम
प्रथमेश हरी नन्नोरे
सारांश अमोल मारबदे
दक्ष अजय वाघाडे
या सर्व चिमुकल्यानी खुप मेहनत घेतली आपल्या पुढे आपण कुठल्या प्रकारे आपल्या छत्रपतींनी चे किल्ला स्वच्छ आणि जिवंत ठेऊ शकतो हे सर्वांना दाखवले आहे.