Home अमरावती वडील शंभर रुपये देत नाही म्हणून मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या ,

वडील शंभर रुपये देत नाही म्हणून मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या ,

364

मानुस्किला काळीमा फासनारी घटना , 

मनीष गुड़धे

 

अमरावती शहरात कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने वडिलांना शंभर रुपये मगितले वडिलांनी देण्यास नकार दिला त्यामुळे व आंघोळ करण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या मुलाने काठीने डोक्यात वार करून स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मत्स्यगंधा कॉलनीमधील गोपाल नगर परिसरात आज उघड़किस आली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीची ओळख मनोहर मधुकर बोरकर (वय 55) अशी झाली असून, आरोपी मुलाचे नाव राहुल बोरकर 25 असे आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात वडील आणि मुलगा यांच्यात काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद होत होते. गुरुवारी रात्रीही मनोहर बोरकर यांनी आंघोळ करण्यास नकार दिल्यामुळे राहुल यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच तीव्र हाणामारीत झाले. संतापाच्या भरात राहुलने घरातील काठी उचलून मनोहर यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्यामुळे मनोहर बोरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, आज सकाळी घरात मनोहर बोरकर यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक पुनीत कुलत यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने (DB Squad) तातडीने तपास सुरू केला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी राहुल बोरकर याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पार्श्वभूमी पोलिस तपासत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एका किरकोळ कारणावरून मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.