Home महत्वाची बातमी बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या भावाचा ही ह्रदयविकाराने मृत्यु ,

बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या भावाचा ही ह्रदयविकाराने मृत्यु ,

550

 

अमिन शाह

बुलडाणा ,

बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या भावानेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना साखरखेर्डा येथे दि 12 मार्चचे दुपारी दीडचे सुमारास घडली दरम्यान या घटनेने घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार असे समजते की, येथील हेमंत सुरडकर यांच्या मातोश्री कै. गं.भा. शशिकलाबाई रामकृष्ण सुरळकर यांचे दिनांक 11/03/2026 ला बुधवारी रात्री 11:30 वा अल्पशा आजाराने निधन झाले. दरम्यान दि 12/03/2026 गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान अंत्यसंस्कारा साठी राम नामदेव ढोबळे 68 रा यवतमाळ हे आले होते बहिणीचे अंत्यसंस्कार उरकून साखरखेर्डा येथे बहेनी च्या घरी आल्यावर अचानक चक्कर येऊन ते पडले असता नातेवाईकांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बहिणी पाठोपाठ भावाने देखील जगाचा निरोप घेतल्याने सुरळकर कुटूंबियांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान सदर भावाचा मृतदेह यवतमाळ येथे पाठवण्यात आला असून ते सेवानिवृत्त मंडल अधिकारी होते त्यांचा मुलगा जर्मनीत नोकरीला आहे. दोघांचा असा अचानक मुर्त्यु झाल्या मुळे परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे ,