Home यवतमाळ बाभुळगाव येथे शांतता समितीची बैठक…

बाभुळगाव येथे शांतता समितीची बैठक…

25
हिंदू-मुस्लीम बांधवानी भाईचारा जतन करण्याचे आवाहन

बाभुळगाव ता. प्र. – येथील पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता आगामी ‘बकरी ईद’ सणाच्या निमित्ताने शहरात धार्मिक सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने शांतता समितीची बैठक पार पडली.
यावेळी सभेला संबोधित करताना पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे म्हणाल्या शहरात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या सोबत आपले सहकार्य फार महत्वाचे आहे.सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने सण साजरा करावा,त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.आपला सण साजरा करताना इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेणे हीदेखील आपलीच जबाबदारी आहे.तसेच बकरी ईद सण निमित्त गावात वाद होणार नाही. याची दक्षता घेणे इतर महत्वाच्या बाबी संबंधित पोलीस पाटील यांना भेंडे यांनी सूचना दिल्या.
यावेळी शांतता कमिटीचे सदस्य अरिफ अली शहेजाद शेख, अंकुश सोयाम, राजू नवाडे,प्रवीण लांजेकर, तालुक्यातील पोलीस पाटील, दिनेश अहिरे हे उपस्थित होते.