Home बुलडाणा बुलढाण्यात एक लाख 91 हजारांचा ऐवज केला होता लंपास!

बुलढाण्यात एक लाख 91 हजारांचा ऐवज केला होता लंपास!

107

 

 

बुलढाणा : चोरटे घर फोडून धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान देत असतांना, बुलढाणा पोलिसांनी त्यांची कॉलर पकडलीच! तेही 5 ते 6 दिवसात.. कारण ‘कानून के हात लंबे होते है!’

बुलढाणा शहरातील मलकापूर मार्गावरील चोपडे शोरूम च्या पाठीमागील वस्तीत सचिन शंकर शिल्लारकर यांचे घर आहे. त्यांचा चहा टपरीचा व्यवसाय आहे. 3 फेब्रुवारी रोजी भरदिवशी दुपारी ते चहाच्या टपरीवर कामाला गेले होते.घरी त्यांची पत्नी आणि आई-वडील हजर होते.ते पण काही वेळानी नातेवाईकाकडे बारशाच्या कार्यक्रमाला निघून गेले होते. घर कुलूप बंद होते. तीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या पत्नी घरी आल्या,तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाटातून 1,40000रुपये दिसून आले नाही.51,000 रुपयांची सोन्या चांदीचे जुने दागिने गायब झाले होते.एकूण1,91,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कलम 331 (3), 305(A), BNS नुसार गुन्हा दाखल केला. तपास चक्र फिरवली असता,घरफोड्या जाळ्यात अडवला आहे. यामध्ये आणखीही आरोपी अटकण्याची शक्यता बुलढाणा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

फोटो ,