
फहीम देशमुख ,
बुलडाणा ,
असे निदर्शनास आले की,सण उत्सवा दरम्यान समाजात संभ्रम निर्माण करणारे मेसेज हे सोशल मीडिया/ व्हाॅटस अप / फेसबुक/ हॅलो/ टेलिग्राम तसेच इतर कोणत्याही डिजिटल माध्यमांद्वारे दोन समाजात जातीय/ धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश/ साहित्य/ चित्रफीत इत्यादी कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तीच्या समुहामध्ये प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच जातीय वैमनस्य/ समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या खोट्या बातम्या, कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तीच्या समुहात प्रसारित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, आय टी ॲक्ट नुसार प्राप्त अधिकारांन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे.
असे कृत्य करणाऱ्यास अथवा प्रवृत्त करणाऱ्यास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील असा असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.
टिप.,,,, *गृप ॲडमिनने गृपमधील सर्व सदस्यांना तशा सूचना द्याव्यात अथवा फक्त गृप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे.*
कुठलाही अनुचित प्रकार घडत असल्यास किंवा घडणार असल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
*गुन्हेगाराने गुन्हा करण्या अगोदर विचार करावा*
*कारण नंतर आम्ही विचार करण्याची संधी देत नाहीत*











































