Home बुलडाणा सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

776

 

पुराच्या पाण्यात मोटर सायकल सह वाहून जात असलेल्या शिक्षकाला दोन युवकांनी वाचविले ,

अमीन शाह

सिंदखेडराजा , सिंदखेडराजा तालुक्यात आज सकाळ पासूनच संतधार पाऊस सुरू असून सर्व नदी नाले खळखळून वाहत आहे आज सकाळी तालुक्यातील सोनूशी येथे सुद्धा नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यातून एक शिक्षक आपल्या कर्तव्यावर जात असतांना त्यांची मोटर सायकल चा संतुलन बिघडला हे पाहताच पुराचा पाणी पाहण्यासाठी गेलेले सोनूशी येथील शेख जावेद व शेख चिली या दोन जबाज युवकांनी जीवाची पर्वा न करता मोटर सायकल चालकास पकडले व सुरक्षित नदीच्या काठावर पाहोचविले आपल्या जीवाची पर्वा न करता त्या शिक्षकाला पुराच्या पाण्यातून सुरक्षित रित्या नदीच्या बाहेर काढणाऱ्या त्या दोन युवकांची सर्वत्र प्रश्नसा केली जात आहे ,