
बुलडाणा – साखरखेर्डा येथे प्रतीबंधीत रासायनिक
अत्यंत हलक्या प्रतीच्या गुलालावर साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी कारवाई करुन 9000/- रुपये किमंतीचा 1080 किलो गुलाल जप्तं करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक कावि/गृह विभाग/कक्ष-4(3)/628/2024 दि.१०/०९/२०२४ अन्वये रासायनिक गुलालाचे उत्पादन करणे विक्री करणे. साठवनुक व वापर करण्यास कायम स्वरुपी बंदी घालण्यात आली आहे जिल्हयातील घाउक व्यापारी किरकोळ व्यापारी साठवणुकदार यांना रासायनिक गुलालावर विक्री व साठवणुक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे त्याऐवजी नैसर्गिक घटकापासुन बनवलेला हर्बल गुलालाचा वापर करण्यात यावा. असा आदेश जिल्हाधिकारी युलडाणा यांनी दिले असुन सदर आदेशाची अंमलबजावणी व्हावी करीता पोलीस स्टेशन साखरखेर्डा कडुन सर्व किराणा दुकान तसेच गुलाल घाउक व किरकोळ विक्रेता यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहीता कलम १८ प्रमाणे नोटीस देण्यात आलेल्या होत्या तसेच जिल्हादंडाधीकारी यांचे आदेशास योग्यं ती प्रसिध्दी वृतपत्रा व्दारे तसेच गणेश मडळ मिटींग तसेच शांतता समीती मिटींग मध्ये तसेच बॅटस ऑप व्दारे तसेच साखरखेर्डा ग्रामपंचायत ग्राम विकास अधीकारी यांना पत्र देवुन देण्यात आली होती तसेच आशीष अरविंद बेंदाले वय ४८ वर्ष व्यवसाय किराणा दुकान सिद्ध जनरल स्टोर , बालाजी किराणा स्टोर यांना पोहेकॉ १६०६ बाजीराव खरात साखरखेर्डा पोलीस स्टेशन यांनी दिनांक १३/०९/२०२४ रोजी भारतीय नागरीक सुरक्षा संहीता कलम १६८ प्रमाणे नोटीस दिलेली आहे. आज दिनांक १४/०९/२०२४ रोजी सकाळी १२/०० पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे महसुल विभागाचे अधीकारी तसेच ग्रामविकास अधीकारी चनखोरे तसेच मंडळ अधीकारी साखरखेर्डा रघुनाथ सोळंके तसेच तलाठी लखण राजपुत तसेच कोतवाल शुभम , अशोक खरात व वैभव सुधाकर तुपकर व पोलीस कर्मचारी यांनी पंचा समक्ष दीपक किराणा न्यु जनता किराणा, बालाजी किराणा चेक केले असता त्यांचे दुकाना मध्ये प्रतीबंधीत गुलाल मिळुन आला नाही त्यानंतर आशीष किराणा स्टोअर संकेत वाईनवार जवळील मलकापूर पांग्रा रोडवरील दुकाना समोर गेलो असता दुकाण दारास आमची तसेच पंचाची ओळख करुन देवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव आशिष अरविंद बेदाडे वय ४८ वर्ष व्यवसाय किराणा साखरखेर्डा असे सांगीतले त्यांना त्यांचे कडे गुलाल आहे काय असे पोलीसांनी विचारले असता त्यांनी चार पाच बैग गुलाल आहे असे सांगीतले असता त्यांना गुलाल असलेले ठिकाण दाखवा असे सांगीतले असता त्यांनी त्यांचे किरणा दुकानचे उजवे वाजुस असलेले गोडवुनचे शटर वर करुन दाखवीले असता तेथे दोन पंच, पोलीस व वरील महसुल व ग्राम विकास अधीकारी यांचे समक्ष १३/४५ वाजता पांढरया रंगाच्या प्लास्टीक बैग एकुन १९ बॅग प्रत्येकी ५० किलो वजनाच्या प्रती वेंग मध्ये लहान १० किलोच्या ५ वॅग असलेल्या तसेच १० किलोच्या १३ बॅग मिळुन आल्या त्या बॅगवर रॉकसॉल्टं असे लिहलेले असुन सदर गुलाल हातावर घेवुन बोटास पाणी लावुन चोळुन पाहीले असता त्या गुलाला मध्ये रासायणीक रंग तसेच बारीक रांगोळी सारखी चुरी आढळुन आली आहे त्यामुळे सदरचा गुलाल घातक व रासायणीक व अत्यन्त हलक्या प्रतीचा रॉक सॉल्ट पासुन वनवीलेला गुलाल असल्याने दोन पंचा समक्ष जप्तं करुन पोलीस स्टेशन येथे आनुन पोलीस स्टेशन साखरखेर्डा अपराध नंवर २३३/२०२४ बी एन एस कायदा कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधीक्षक बि.बी. महामुनी,उपविभागीय पोलीस अधीकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथील ठाणेदार सपोनि गजानन दिगांबर करेवाड, सपोनि मिलींद पारडकर नेम नियंत्रण कक्ष बुलढाणा. पो उप नि ए.डी थोपटे, शुभम वरदाडे नेमणुक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशीक, पोहेकॉ नितीन प्र. राजे जाधव पोहेकॉ वाजीराव खरात, चालक पोकों वाघ व चालक पो कों मेहेर पोस्टे साखरखेर्डा मपोकॉ /2470 कांबळे, मपोकॉ/2477 नेमणुक पोलीस मुख्यालय बुलढाणा, ग्राम विकास अधीकारी श्री ज्ञानेश्वर चनखोरे, महसुल स्टॉफ मंडळ अधीकारी साखरखेर्डा रघुनाथ सोळंके तसेच तलाठी लखण राजपुत तसेच कोतवाल शुभम अशोक खरात व वैभव शुभाकर तुपकर झालेल्या कार्यवाहीत यांचा सहभाग होता झालेल्या कार्यवाही मुळे विक्रेत्या मध्ये खळबळ उडाली आहे .












































