Home बुलडाणा स्टेट बँकेच्या मलकापूर पांग्रा शाखा व्यवस्थापकाची ग्राहकाशी उद्धट वागणूक

स्टेट बँकेच्या मलकापूर पांग्रा शाखा व्यवस्थापकाची ग्राहकाशी उद्धट वागणूक

130

विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांची कारवाई करण्याची मागणी

सिंदखेडराजा
तुक्यातील मलकापूर पांग्रा येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक ग्राहकाशी उर्मट बोलून अरे रावीची भाषा करत आहेत आम्ही सरकार आहे आमचं कुणी वाकड करू शकत नाही असे बोलून ग्राहकाला अपमानित करत असल्याने सदर शाखा व्यवस्थापकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी विशेष घटक योजनेतील शेळ्या बकऱ्यांचा लाभाची मागणी करणाऱ्या वाघाळा येथील भगवान खरात यांनी केली आहे
याबाबत माहिती अशी की मलकापूर पांग्रा स्टेट बँकेमध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष घटक योजना अंतर्गत 10 शेळ्या आणि एक बोकडाची प्रकरण बँकेत आले होते त्या प्रकरणाचा सबसिडीचा चेक देखील पशुसंवर्धन विभागाने बँकेला दिला होता सदर प्रकरणाचा लाभ आतापर्यंत का देण्यात आला नाही याची विचारपूस करण्यासाठी भगवान खरात यांनी स्टेट बँक शाखा व्यवस्थापक लाल किशोर कुमार यांच्याकडे गेले त्यानंतर मात्र शाखाधिकारी किशोर कुमार यांनी तुमच कोणत प्रकरण आहे त्याचा चेक संबंधी माहिती परत पशुसंवर्धन विभागाकडून आणा आमच्याकडे माहिती नाही विमा दाखवा असे अनेक कारणे सांगून सदर लाभार्थ्याला बुलढाणा येथे आणण्या साठी पाठवले सदर लाभार्थ्याने दिलेल्या चेक यासंदर्भात बुलढाणा पशुधन विभागाकडून आवक जावक ची नक्कल आणली मात्र सदरचे रजिस्टर मध्ये तुमचे नाव नाही असे सांगून हुज्जत घातली

पत्रकारांना माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकाचा नकार
या प्रकरणी सदर प्रकरणात लाभार्थ्याला आतापर्यंत लाफ का दिला नाही आणि जर हे प्रकरण मंजूर झाले नसेल तर मग पशुसंवर्धन विभागाचे सबसिडी चेक तुम्ही आतापर्यंत परत का केले नाही यासंदर्भात विचारले असता शाखा व्यवस्थापक यांनी हम सरकार हे आम्ही काही करू शकतो तुम्ही आम्हाला कसे काय विचारले असे विभागाचे पत्रकारांना देखील माहिती दिली त्यावेळी पत्रकार या संदर्भात चौकशी करण्यासाठी बँकेत गेले असता पत्रकार यांचेशी देखील मॅनेजरने हुज्जत घालून हम सरकार हे तुम्हाला बँकिंग माहिती आहे असे सांगून माझा वेळ वाया कसा घातला तुम्ही बँकेत कसे आले असे सांगून उर्मटपणे बोलले
अश्या या मग्रूर शाखा व्यवस्थापक लाल किशोर कुमार यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील खरात यांनी केली आहे