
चक्क भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्या जवळ सापडले लाखो रुपये एटीएम चेक बुक अन , बरेच काही ???
अमीन शाह
बुलडाणा ,
जिल्ह्यातील मेहकर येथे एका भिकाऱ्याच्या सायकलला एका दुचाकीची धडक लागून तो जखमी होतो आणि नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू होतो. दरम्यान पोलीस तपासात त्याच्या थैलीत आणि गोधडीत सापडतात लाखो रुपये, मेहकरमधील अनेक बँकांची पासबुके, एटीएम आणि चेकबुक्स सगळा प्रकारच चक्रावून सोडणारा. एखाद्या हिंदी सिनेमात शोभावा अशी ही घटना इथे घडली.
झाले असे की, ८ नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती स्थानिक डॉ. महेश येवले यांच्या डोणगाव रोडवरील रुग्णालयासमोरून सायकलवर जात असताना त्याला एका अज्ञात दुचाकीने धडक दिली व तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर डॉ. येवले यांनी उपचार करून डॉ. सातपुते यांच्या रुग्णालयात भरती केले. त्याची थैली आणि गोधडी डॉ. येवले हॉस्पिटलसमोर पडून होती, जी त्याच्या सायकलवर होती.
डॉक्टरांनी मेहकर पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस आले. जखमी व्यक्तीच्या थैलीत लाखो रुपये होते. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोला पाठविले. रुग्णाची गोधडी येवले हॉस्पिटलसमोर ८ नोव्हेंबर रोजी दिवसभर पडून होती. तिला कुणीच हात लावला नाही.
गोधडीत आणखी मोठी रक्कम, मेहकरमधील अनेक बँकांची पासबुके, चेकबुक्स, एटीएम आणि चिल्लर भरलेली थैली पोलिसांना सापडली. त्यात
एक्सीस बँकेत जवळपास २६ हजार ते ही मे महिन्या पर्यंत त्यानंतरच्या एंट्रीज नाहीत. मेहकर अर्बन बँक पासबुकात एक लाख नऊ हजार २८४ रुपये व प्लास्टिकच्या दोन कॅरी बॅगमध्ये, ३, ४ हजारची चिल्हर व इतर अनेक बँकांच्या पासबुकात मोठ्या रकमा पोलीसही हा सगळा प्रकार पाहून चक्रावून गेले. बँकेतील जमा रकमांच्या एंट्रीज जुन्या आहेत. कदाचीत गेल्या काही महिन्यात आणखी रकमा जमा केल्या गेल्या असाव्यात. पोलीस तपासात त्याचा उलगडा
होईल. अकोला येथे त्या श्रीमंत भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह १० नाव्हेंबर रोजी मेहकर येथे आणला गेला. त्याच्या थैलीतील कागदपत्रावरून तो अंजनी बुद्रुक येथील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाल्यावर ठाणेदार राजेश शिंगटे, सहायक फौजदार संग्राम ब्राम्हणे आणि पत्रकार असे सगळे त्याच्या गावी पोचले. मृतक दीपक बाबुराव मोरे वय ४८ याची पत्नी चंदा दीपक मोरे, मुलगा धम्मपाल दीपक मोरे यांच्याकडे पोलिसांना तपासात सापडलेली लाखो रुपयांची रक्कम, पासबुके, एटीएम ,चेक बुक सुपूर्द केले ,
कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशी अफलातून, नाट्यमय घटना मेहकरात घडली आहे. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशी ही घटना कमालीची चक्रावून टाकणारी आहे. भीक मागणाऱ्या मृतकाचा सायकलवरून जातांना अपघात होतो आणि त्यातून त्याच्याकडील मोठे घबाड उघडकीस येते, यातून सगळा चक्रावून टाकणारा, अकल्पनिय प्रकार उघडकीस येतो हे सगळे नाट्यमय वाटत असले तरी खरे आहे.
त्याची पत्नी व मुलास चेकबुक्स सुपूर्द करण्यात आले. मृतक हा मेहकर शहरात गेले अनेक दिवस भीक मागत होता व सोबतच भंगार जमा करून ते विकण्याचे कामही करत होता, असे ठाणेदार शिंगटे यांनी सांगितले. अंजनी बुद्रुक येथे मृतकाचे चार टिनांचे घर आहे. अतिशय गरिबीच्या व दारिद्र्यमय परिस्थितीत मृतकाची पत्नी व मुलगा जीवन व्यतीत करत असल्याचे दिसून आले. मृतकाला तीन विवाहित मुली आहेत.












































