
सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले शिंदी येथे दिनांक 10 नोव्हेंबर पासून
गावातील काळुंका माता देवस्थानाच्या सभागृहामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व एका पायाने अपंग असलेले समाधान बंगाळे यांनी गावातील छुप्या मार्गाने सुरू असलेले अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याकरता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ‘
प्रसार माध्यमाशी संवाद साधताना समाधान बंगाळे यांनी सांगितले की शिंदी गावामध्ये अवैध दारू विक्री काही लोक करत असून गावामध्ये दारू भेटत असल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाली आहे ‘काही महिलांनी आपला पती कोणी आपला भाऊ कोणी आपला मुलगा तर कोणी आपला बाप दारूमुळे गमावला आहे ‘
आतापर्यंत दारू पिल्यामुळे गावातील तब्बल 22 व्यक्तींचा मृत्यू झालेला असून आणखीन काही मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे,
त्यामुळे गावातील सर्वच सोप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध दारू कायमची हद्दपार करावी अशी मागणी सुद्धा उपोषणकर्ते समाधान बंगाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तथा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे केली आहे ,
उपोषण करते समाधान बंगाळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला गावातील सरपंच सौ साधना अशोक खरात ‘तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव बंगाळे ‘माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर गावडे
यांच्यासह खासदार जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे ‘
चौकटीत
तर सध्या एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दौऱ्यावर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा दूरध्वनीवरून समाधान बंगाळे यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी सुद्धा दूरध्वनी वरून संपर्क साधला आहे ‘ त्यांनी सुद्धा उपोषणास पाठिंबा दिला आहे !
— — =
समाधान हा एका पायाने पूर्णपणे अपंग आहे त्याला नीट चालताही येत नाही परंतु गावातील समस्येसाठी त्यांनी उपोषण सुरू केली आहे त्या उपोषणा सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे !
जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून बसले आहे ‘












































