Home बुलडाणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांची ठिक ठिकाणी अवैध देशी...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांची ठिक ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई , मुद्देमाल जप्त.

124

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:-स्थानिक अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या बिट मध्ये अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने पोलिस स्टेशनला वाढत्या तक्रारी येत असल्याने ठाणेदार विकास पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दि.२नोव्हेंबर रोजी ठिक ठिकाणी स्वता धडक कारवाई करत अनेक ठिकाणी अवैध देशी दारू चा माल हस्तगत केला.


दोन दिवसांवर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतसाठी मतदान होत असल्याने कुठेही आचारसंहितेचा भंग होता कामा नये म्हणून ज्या ज्या गावात ग्रामपंचायत मतदान आहे तेथे आतापासूनच ठाणेदार यांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपले लक्ष केंद्रित केले असुन संबंधित पोलिस पाटील यांना सुध्दा सुचना देण्यात आलेल्या आहेत.
ठाणेदार विकास पाटील यांनी दि.२नोव्हेबर रोजी रोहडा येथील भिमराव शंकर खरात यांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी देशी दारू टॅगो कंपनीच्या १८०एम.एल च्या ११बाॅटल अंदाजे किंमत ९५०रुपये मिळुन आल्या आहेत.तसेच मेरा बु येथे भगवान विक्रम पारधे यांच्या कडे रेड केली असता टॅगो कंपनीच्या देशी दारू च्या १०बाॅटल अंदाजे किंमत ९००रुपयांचा मुद्देमाल अंढेरा पोलिसांनी जप्त केला असुन अंढेरा बिट अंतर्गत येणारे मेंडगावं येथे देवीलाल हरिश्चंद्र खरूळे यांच्या कडे रे ड करत टॅगो कंपनीच्या देशी दारू च्या १२बाॅटल अंदाजे किंमत ९९०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन शिवणी आरमाळ शिवारात युनिसखा नुरखा पठाण यांच्या कडे रेड करत टॅगो प्रेमियरच्या १०बाॅटल जप्त करण्यात आला असुन एकूण ४३बाॅटल देशी दारू च्या अंदाजे किंमत ३७५०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरोधात कलम ६५ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई ठाणेदार विकास पाटील सोबत, सिध्दार्थ सोनकांबळे,विजय जाधव, कैलास उगले, ज्योत्स्ना गवई,भागवत गिरी,गोरख राठोड,यांचा सहभाग होता.
ठाणेदार विकास पाटील यांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची तसेच आंचारसहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणेदार विकास पाटील यांनी दिला आहे.