
सत्येत असूनही हाल सर्वसामान्यांचे बे हाल..?
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा :-शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या बेटावर सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घ्या यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बस स्थानक चौकात रस्ता रोको केले. सदर आंदोलनामुळे काही वेळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली तर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.
शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख यांनी अवैध वाळू संदर्भात महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा म्हणून खडकपूर्णा प्रकल्पाच्या बेटावर २ ऑक्टोबर रोजी पासून उपोषणाला सुरुवात केली. सदर उपोषणा भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करा व उपोषण मार्गी लावा. या मागणीसाठी बसस्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर यांच्या मार्गदर्शनात बसस्थानक चौकात
शिवसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास रस्ता रोको दरम्यान शिवसेना नेत्यांनी आंदोलन करताना मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार असमा मुजावर या आंदोलनकर्त्यांचे उपोषण घेण्यासाठी आले असता एसडीओ यांना निवेदन घेण्यासाठी बोलवा अशी भूमिका
आंदोलनकर्त्यांनी घेतली. शेवटी उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदन स्वीकारले. सदर आंदोलनात उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, ज्येष्ठ नेते धनशीराम शिंपणे, विजय मंडपे, विजय घोंगे, संदीप राऊत, विवेक
खेडेकर, शिवाजी कुहीरे, बाबुराव मोरे, रंजीत काकड, प्रकाश गीते, श्रीनिवास खेडेकर,नंदन खेडेकर,पूजा खांडेभराड, सिद्दीक पहेलवान, सचिन व्यास, अतिश खराट, सचिन भागीले, प्रभाकर भांडेभराड, संदीप मगर, वैभव देशमुख, विकास भाग्यवंत आदींनी सहभाग घेतला.












































