
मुस्लिम समाज बांधवानी दिले निवेदन ,
अमीन शाह
साखरखेर्डा गावाला लाभलेली पौराणिक, ऐतेहासिक आणि साहित्यीक ख्याती वैश्विक आहे, एकहजार वर्षांची प्रदीर्घ अध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेला पलसिद्ध महास्वामींचा पुरातन मठ, 500 वर्षांपूर्वीची निजामकालीन जामा मशिद, हजरत अनामत खां शहीद रहेमतुल्लाह अलैह यांचा सर्वधर्मीयांचा पवित्र दर्गा, समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज संस्थान एकंदरीत सामाजिक सलोख्याची पाळेमुळे या पावन भूमीत खोलवर रुजलेली आहेत, सर्वजातीधर्माची मंडळी या गावात आजतागायत गुण्यागोविंदाने नांदत आली आहे,आषाढी एकादशी आणि बकर ईद एकाच दिवशी येत असल्याने त्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय साखरखेर्डा नगरीच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे, आषाढी एकादशी आणि बकरईद एकत्र येणे सामाजिक सलोख्याचा शुभसंकेत आहे, उपरोक्त सश्रद्ध पार्श्वभूमी लक्षात घेता मुस्लिम समाजाने बकरईदला कुर्बानी न करण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक एकोप्याला बळकटी देणारा आहे
दिनांक 29/06 2023 रोजी येणारी बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी येत असल्याने हा ऐतेहासिक निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे , या संदर्भात आज पोलीस स्टेशन येथे ठाणेदार नंदकिशोर काळे यांना निवेदन देण्यात आले या वेळी प्रख्यात नामवंत कवी निवेदक अजीम नवाज राही , माजी सरपंच दाऊद सेठ कुरेशी ,सय्यद रफिक उप सरपंच पत्रकार अमीन शाह , इब्राहिम शाह माजी उप सरपंच , शेख रफिक प्यारे माजी उप सरपंच , शेख अय्युब कुरेशी माजी उप सरपंच , हबीब बावा , मो, शफी , फैसल खान , शेख कमर ,बाबू सेठ कुरेशी , युनूस शाह ,अन्सार सेठ कुरेशी , अजीज नाजा , आदी बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते , या वेळी ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन ही केले ,













































