
तहसीलदाराचे पेट्रोल पंप धारकांना निर्देश.
पण किती पेट्रोल पंप मालक निर्देश पाळतात…?
प्रतिनिधी:-
देऊळगाव राजा :-अवैधरित्या चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन देऊ नये असे निर्देश पत्राद्वारे तहसीलदारांनी पेट्रोल पंप चालकाला दिले आहे देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उत्खनाला आला घालण्यासाठी तहसीलदार श्याम धनमने यांनी प्रभावी कृती आखली आहे तालुक्यातील पेट्रोल पंप चालकाना पत्र देऊन रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिझेल पेट्रोल देऊ नका असे आदेश निर्गमित केले आहे सद्यस्थितीत तालुक्यातील कुठल्याही रेती घाटावर हराशी झालेली नाही आणि अनेक विना नंबरच्या वाहनातून अवैध रेती वाहतूक होत आहे अशा वाहनांना इंधन देऊ नका व पेट्रोल पंपावर थांबवू देऊ नका असे आदेश तहसीलदार यांनी दिले आहे अवैध वाळू वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदार यांनी काढलेल्या नवीन आदेशामुळे माफियामध्ये खळबळ उडाली आहे अवैध वाळू वाहतूकदारांच्या अडचणीमध्ये या निर्णयामुळे अडचण निर्माण होणार आहे.एव्हडे मात्र खरे…












































