Home बुलडाणा जुल्फेकार भाई मित्र मंडळाकडुन उमराला जाणाऱ्यांचे सत्कार समारंभ संपन्न

जुल्फेकार भाई मित्र मंडळाकडुन उमराला जाणाऱ्यांचे सत्कार समारंभ संपन्न

123

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-उमरा ही मक्का, हिजाज, सौदी अरेबिया येथील इस्लामिक तिर्थयात्रा आहे, जी मुस्लिमांनी वर्षातील कोणत्याही वेळी केली जाऊ शकते, हजच्या उलट,ज्याच्या इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेनुसार विशिष्ट तारखा आहेत. अरबी भाषेत ‘उमराह’ म्हणजे “लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जाणे” आहे. शरियामध्ये उमराह म्हणजे इहराम (पवित्र वस्त्र) धारण केल्यानंतर काबा आणि सई दरम्यान सफा आणि मरवा दरम्यान तवाफ करणे. -मिकत हुलाफा, जुहफा, कर्नू एल-मनाझिल, यल्लम, जात-इ-इर्क, इब्राहिम मुर्सिया किंवा अल-हिल. हवाई प्रवाश्यांसाठी भिन्न परिस्थिती अस्तित्वात आहे, ज्यांनी मक्का शहराविषयी विशिष्ट परिक्रमा केल्यानंतर इहराम पाळणे आवश्यक आहे. कधीकधी ‘लहान तीर्थयात्रा’ किंवा ‘कमी तीर्थयात्रा’ म्हटले जाते, हज ही ‘प्रमुख’ तीर्थयात्रा आहे जी ती करण्यास सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य आहे.उमराह अनिवार्य नाही परंतु केले तर पुण्य आहे.
देऊळगाव मही येथुन दिनांक 6 मे 2023 रोजी जामा मस्जिदचे शाही इमाम हसन रजा व गावातील एक हसमुख व्यक्ती शफी नाना व त्यांची पत्नी उमरा करण्यासाठी रवाना झाले. देऊळगाव मही गावाची एक प्रथा अशी आहे की जे कोणी हज किंवा उमरा साठी जातो त्याला मान सन्मान दिला जातो.त्यांचे सत्कार केले जाते.याच विषयी दिनांक 5 मे 2023 रोजी गावातील प्रतिष्ठित असलेला जुल्फेकार भाई मित्र मंडळ यांच्या कडुन उमऱ्याला जाणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.सत्काराचा प्रोग्राम ग्रुपचे मुख्य कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ते शिक्षक,जहीर खान सर यांच्या घरी ठेवण्यात आला होता.यावेळी हसन रजा,शफी नाना व सहकाऱ्यांचे पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले व त्यांना यात्रे साठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमात मन्नान खान पठाण,मजीद भाई, अशरफ भाई,सत्तार भाई, दाऊद खान, युनूस खान,अल्ताफ खान, अल्ताफ खान मुबीन खान, राजू भाई,जाहेद खान,ग्रुपचे अध्यक्ष शेख जुल्फेकार,जहीर खान सर,जुबेर खान,फेरोज खान,जफर भाई,अनिस खान,शेख बिलाल यांची मुख्य उपस्थिती होती.यावेळी ग्रुपचे कार्यकर्ते मीजान खान,अरबाज खान,शेख सलमान, अरबाज(राजा) खान, शेख सोहिल, इस्माईल खान,फैजान भांजा,अख्तर नवाज,फैजान खान व ग्रुपचे बाकी सर्व सदस्य उपस्थित होते.