
जव्हार* : *सोमनाथ टोकर
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायत कौलाळे पैकी(मोख्या चापाडा )येथे दरवर्षीप्रमाणे याही जय हनुमान वर्धापन दिन निमित्त अखंड हरिनाम मोख्या चापाडा ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्व हनुमान भक्तांनी आयोजन केले होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून जगात ओळख आहे. जवळपास बाराव्या शतकापासून महाराष्ट्राला सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत निवृत्तीनाथ,संत मुक्ताबाई ,संत जनाबाई,संत नामदेव, संत एकनाथ,संत तुकाराम, विठ्ठल रखुमाई , महाबली जय हनुमान हे यांच्या रूपात. असे अनेक थोर संत या भूमीवरती होऊन गेले. हे सर्व संत विविध जाती धर्माचे होते एकत्र येऊन त्यांनी वारकरी संप्रदाय करण्याचा प्रयत्न केला. हे फार लोन लौकिक गोष्ट आहे. या सर्वांनी अभंग काव्याच्या माध्यमातून भरकटलेल्या समाजाला योग्य प्रवाहात आणण्याचे काम केले. जे आधी अखंडपणे त्यांनी लिहिलेल्या अभंग काव्यरचनेतून सुरूच आहे. यास्तव आधी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी वारकरी संप्रदाय,आषाढी एकादशी,हनुमान जयंती, शिवजयंती दिंडी कीर्तन, भारुड भजन आदिचे आयोजन केले जाते. वरील प्रमाणे मोख्या चापाडा येथे जय हनुमान वर्धापन दिन सोहळा मोख्याचा पाडा अवचित साधून दिनांक 21 ते 23एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम तीन दिवसाचे आयोजन करण्यात होते.यासाठी त्यांनी ह. भ.प परमपूज्य. गुरुवर्य विठोबा महाराज भागडे ( इगतपुरी सदो -) यांच्या आशीर्वादाने व प्रेरणा घेतली आहे. जय हनुमान वर्धापन दिन चे यंदा 6 वे वर्ष आहे. जव्हार शहरापासून पासून 7 किमी अंतरावर असलेले मोख्या चापाडा येथील जय हनुमान मंदिर चे प्रतीक म्हणून ओळखले जाते.खरंतर याच कारणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे जय हनुमान वर्धापन दिन सोहळा औपचारिक साधून दिनांक 21 ते 23 एप्रिल महिन्यात आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसाचे कीर्तन ह भ प चंदू महाराज भोये, दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन ह भ प परमपूज्य विठोबा महाराज भागडे, काल्याचे किर्तन, ह भ प पांडुरंग महाराज मौळे यांनी कीर्तन सेवा केली.यासाठी मंडळाचे हभप परमपूज्य विठोबा महाराज भागडे ( इगतपुरी ) किसन बाळू चौधरी, कै. देवराम चौधरी,जानू बाबा चौधरी, , रामा लखमा रंधाबाबा , परशुराम निकम बाबा, गोपाळ रंधा,रवींद्र गरेल, धवळू महाराज कोकाटे, खंडू महाराज भोगाडे, तुकाराम चव्हाण, अशोक महाराज धोडी, शंकर टोकरे.विजय भोगाडे,मोख्याचा पाडा गावातील तरुण मंडळी, जयश्री चव्हाण, सुरेखा गरेल. मंदिर पुजारी लक्ष्मण टोकरे. प्रकाश गरेल, केशव टोकरे, सोमनाथ टोकरे (पत्रकार )चंद्रकांत रंधा. कार्यक्रमाचे सचिव अशोक महाराज धोडी यांनी बोलताना सांगितले.











































