
जव्हार :- सोमनाथ टोकरे
जनसंवाद अभियाना अंतर्गत आज दि.११ एप्रिल २०२३ रोजी जव्हार पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसह जव्हार मधील तरुण-तरुणी महिला यांनी या रक्तदान शिबिरास उस्फूर्तपणे सहभाग दर्शवून रक्तदान केले. जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांच्या नेतृत्वाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जव्हार, मोखाड्या सारख्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाचे प्रमाण असून सातत्याने रक्ताची गरज भासत असते याच उद्देशाने जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून जव्हार पोलीस ठाण्याच्या वतीने जव्हार पतंगशहा कुटीर रुग्णालय रक्तपेढी व लोकमान्य टिसा ब्लड बँक सेंटर ठाणे ह्या दोन रक्तपेढींन मार्फत रक्त संकलन करण्यांत आले .१८० रक्त दात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.











































