(आरपीआय (संविधान) पक्षाच्या डॉ. माकणीकर यांचे आवाहन)
मुंबई , (प्रतिनिधी) सोलापूर प्रमाणे मराठवाड्यातील उस्मानाबाद (धाराशिव) येथील कानेगावात जाऊन मोठ्या संख्येने भीम जल्लोष साजरा करू असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केले.*
आर एस एस प्रणित भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात जातीयवाद वाढला असून जातीय द्वेषामुळे भीमजयंती साजरी करण्यास जातीयवादी संस्था, संघटना, पक्ष, संवर्णं किंवा जातीवादी व्यक्ती कडून मज्जावं केला जात आहे. मात्र असे प्रकार आंबेडकरी जनता कदापि खपवून घेणार नाही. अश्या विकृतींवर आंबेडकरी वचक बसणे गरजेचे असल्याचेही मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यातील पूर्णा येथे परभणी जिल्ह्यात मागे झालेल्या जातीयवादी विकृतीला सामांजस्याने आंबेडकरी जनतेने एकतेची ताकत दाखवली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरात जसे सार्वजनिक आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो त्याच धरती वर या वर्षी पासून कानेगावात सर्व पक्षीय आंबेडकरवाद्यांनी एकत्र येऊन भीम जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन डॉ. माकणीकर यांनी केले आहे.