
पुणे ( प्रतिनिधी ) – दि. २७/०२/२०२३ पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा/ शहर च्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांची झालेली निर्गुण हत्याची फास्ट ट्रॅक केस कोर्टात चालवण्याची मागणी पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे पाटील यांनी पत्रकार बांधवा समवेत पुणे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख द्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या कडे करण्यात आली आहे. पुरोगामी राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत.












































