Home बुलडाणा बापरे बाप विड्रॉल हजाराचा मिळाले आठशे रुपय

बापरे बाप विड्रॉल हजाराचा मिळाले आठशे रुपय

178

देऊळगाव मही येथील स्टेट बॉंकच्या रोखपालाच अजब गजब कारभार

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रतिनिधी:-( रवि आण्णाजाधव )

देऊळगाव मही:- अशिक्षित व वयस्कर लोकांची दिवसा ढवळा फसवणूक स्टेट बँकच्या रोखपालाने केली आजीबाईची दोनशे रुपयाची फसवणूक एक हजार रुपयांचा विड्रॉल करण्यास गेल्यानंतर येथील स्टेट बँक शाखेचा कँशिसर नागरिकांच्या हातात मात्र आठशे रुपयेच देत असल्याचा आरोप युवा सेनेचे शहरप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य संदिप राऊत यांनी केला आहे .याबाबतीत विचारणा केली असता रोखपाळाने अरेरावीची भाषा केली व तुझाकडून काय होत करून घे दोघांची बाचाबाची झाली. याबाबत संदिप राऊत यांनी सांगितले भारतीय स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात निराधार व अशिक्षित लोकांची खाती आहेत. याठिकाणी कार्यरत असलेले रोखपाल एक हजारांचा विड्रॉल घेऊन आठशे रुपये देण्याचा प्रताप करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत .रोखपालाला जाब विचारल्यास अरेरावीची व दादागिरीची भाषा वापरतात. अशा मुजोर रोखपालावर कारवाई करावी .अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संदीप राऊत यांनी दिला आहे.या प्रकाराची वरिष्ठ अधिकारी दखल घेतीलका.एव्हडे मात्र खरे….