Home बुलडाणा चॉकलेटने घेतला एका निष्पाप मुलाचा बळी ,

चॉकलेटने घेतला एका निष्पाप मुलाचा बळी ,

343

 

दुःखद घटना ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

एका पाच वर्षाच्या निरागस मुलाच्या श्वसन मार्गात चॉकलेट अडकल्याची दुर्दैवी घटना धाड येथे घडली. एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने धाडमध्ये शोकाकुल वातावरण आहे. मिळालेल्या माहिती नुसार धाड येथे राहणाऱ्या शेख याह याह नावाचा 5 वर्षांचा मुलगा घराच्या अंगणात खेळत होता. मुलगा खेळत असतांना कोणीतरी त्या मुलाला चॉकलेट दिले. तो चिमुकला चाकलेट मिळताच जाम खुश झालं चॉकलेट मिळाल्यावर मुलाने खूप आनंदाने चॉकलेट खाल्ले आणि थोड्या वेळाने अचानक अंगणात चककर येऊन पडल त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ मुलाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाची तपासणी केली असता त्या मुलाचा मृत्यू झाला होता दरम्यान श्वसनमार्गामध्ये चॉकलेट अडकल्याने सदर बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घडलेल्या घटने मुळे गावात दुःख पसरले असून सर्वत्र हळ हळ व्यकत केली जात आहे ,