
नराधम शिक्षकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,
अमिन शाह
बुलडाणा ,
सोबत ये – जा करणाऱ्या शिक्षकाने झालेल्या ओळखीचा गैर फायदा घेत चाकुचा धाक दाखवून सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची व अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली शिक्षकि पेशाला काळिमा फासणारी ही घटना खामगाव शहरात घडली असून पीडित शिक्षिकेच्या तक्रारी वरून दुष्कृत्य करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला व या नराधम शिक्षकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे . या संदर्भात मीळालेल्या माहिती नुसार शहरातील बोबडे कॉलनी भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय शिक्षिका तालुक्यात एका गावातील शाळेवर कार्यरत असून रमाई संकूल समर्थनगर भागातील रहिवासी शिक्षक श्रीकांत गुलाबराव वानखडे ( ४६ ) हे हिंगणा – कारेगाव येथील शाळेवर कार्यरत आहेत . ही दोन्ही गावे एकाच रोडवर असल्याने हे दोघे शिक्षकांसोबत एका कारने खामगाव वरुन ये – जा करतात . यामुळे त्यांच्यामध्ये चांगली ओळख झाली होती . दरम्यान शिक्षक श्रीकांत वानखडे याने सदर शिक्षिकेला घरी बोलाविले व आतील दार लावून घेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला . यावेळी सदर शिक्षिकेने नकार देवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता वानखडे याने चाकुचा धाक दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले . तसेच त्याने तिचे फोटो काढून हा प्रकार तू कुणाला सांगितल्यास हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल तसेच व्हायरल करेल अशी धमकी दिली . याबाबत पीडित शिक्षिकेने शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी सदर तक्रारीवरुन दुष्कृत्य करणारा शिक्षक श्रीकांत गुलाबराव बानखडे याच्याविरुध्द कलम ३७६ , ३७६ ( २ ) ( एन ) ३७६ , ( क ) ( ब ) ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे .











































