Home बुलडाणा जील्हा परिषद शाळा राताळी व ग्रामपंचायत  यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व राज्य...

जील्हा परिषद शाळा राताळी व ग्रामपंचायत  यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व राज्य आदर्श पुरस्कार मिळाल्या बदल सत्कार

296

.

साखरखेर्डा  प्रतिनिधी ,

जील्हा परिषद शाळा राताळी व ग्रामपंचायत  यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक व राज्य आदर्श पुरस्कार मिळाल्या बदल सत्कार व स्नेहभोजनाच्या व निरोप समांरभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयातचे प्राध्यापक शामरावजी दुतोंडे,सेवानिवृत्त शिक्षक वसुदेवजी पंचाळ, मधुकराव रिन्ढे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा समिती अध्यक्ष तेजरावबापु पाटील हे होते तर राताळी सरपंच सौ अलकाताई लव्हाळे व भानुदास लव्हाळे माजी सरपंच जनार्दन साबळे ,येवलेमँडम होते. यावेळी शाळेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक पंचाळसर ,रिन्ढेसर, दुतोंडेसर यांचा सत्कार केला त्यानंतर राताळी ग्रामपंचायतच्या वतीने पंचाळसर रिंन्ढे सर, दुतोंडेसर व ज्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले टि के देशमुख यांनीही सत्कार सरपंच सौ अलकाताई भानुदास लव्हाळे यांनी केला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना पंचाळ सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि आजच युग हे स्पर्धा परिक्षेच आहे जो अभ्यास करेल तोच टिकेल . तर रिन्ढे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि हि शाळा सोडून जातांना शाळेचा शिक्षकांचा मान तुमच्या अभ्यासातुन मान उंच करा .प्राध्यापक दुतोंडे यांनी तुमच्या उज्वल भविष्यासाठी शासनाने अनेक योजना शिष्यवृत्ती सुरू केलेल्या आहेत त्याला पात्र होण्याची तयारी आजपासूनच करा डोळ्यासमोर उद्देष्ट ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हावे तर भानुदास लव्हाळे यांनी हि शाळा आपले मंदिर आहे याचे पावित्र्य राखा .तसेच शाळेचे तुमचे व आईवडील यांचे स्वप्न करा.ज्यामुळे गावचा मान वाढल असे यश मिळवा असे सांगितले. तसेच टि के देशमुखयानी चांगला उपक्रम परमंपरा सुरूकेली असे सांगितले तर अध्यक्षाच्या वतीने सरपंच सौ अलकताई लव्हाळे यांनी तुम्ही गुरुजनांचे मार्गदर्शन लक्षपूर्वक समजून घ्या शिक्षकाला आपला विद्यार्थी अधिकारी झाला तर आपल्या स्वतःच्या मुलापेक्षाही त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांना मान ठेवूनच तुम्ही मोठे व्हा असे सांगितले . यावेळी टि के देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन कैलास पर्हाड यांनी केले आभार प्रदर्शन सुधाकरराव रीन्ढे यानी केले कार्यक्रम संपल्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी आठविच्या मुलांना निरोप समांरभाच्या निमित्ताने स्नेहभोजनाचा आस्वाद  पाहुण्यांनी घेतला .