Home साहित्य जगत डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या”आनंदवारी”पुस्तकाचे प्रकाशन डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते संपन्न !

डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या”आनंदवारी”पुस्तकाचे प्रकाशन डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते संपन्न !

499

 

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) –

श्रीरामपूर येथील डॉ. श्रीकांत गजानन भालेराव यांच्या ‘आनंदवारी’या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन अतिशय मनोहरी, प्रेरणादायी उपक्रमांनी नुकतेच संपन्न झाले.
येथील मोरगेवस्ती परिसरातील अपूर्व हॉलमध्ये साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अर्थतज्ञ डॉ.बबनराव आदिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पुस्तक प्रकाशनप्रसंगी प्रकाशिका डॉ. सोनल भालेराव यांनी स्वागत केले.लेखक डॉ. श्रीकांत भालेराव यांनी ‘आनंदवारी ‘पुस्तकांची निर्मितीप्रेरणा स्पष्ट केल्या.रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. वैभव भालेराव यांनी मान्यवरांचा सत्कार केले.उदय ऑसेटचे उदय साबळे, रोहिणी आर्टसचे सुरेश वाघुले, सूत्रसंचालक शकील बागवान आणि मित्रपरिवार, सहकार्यांचा डॉ.भालेराव परिवारातर्फे पुस्तके, बुके देऊन सन्मान करण्यात आला.अतिशय वेगळ्या आणि नाविण्यपूर्ण वातावरणात पुस्तक प्रकाशन संपन्न झाले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘आनंदवारी’सारख्या आनंदसहलीचा मनमोकळा प्रवासवृतान्तपर पुस्तकाचे आपल्या हस्ते प्रकाशन झाले, हा सन्मान आपणास दिल्याबद्दल डॉ.भालेराव परिवार आणि प्रस्तावनाकार डॉ.शिरीष लांडगे यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत सांगितले की लेखन हे खरे आपले अपत्य असते, तो आपल्या जीवनाचा ज्ञानदीप, वंशदिवा असतो, तो आपले विचार आणि अनुभव दीर्घकाळ प्रकाशित ठेवतो त्यासाठी प्रत्येकाने आपले अनुभव आणि जीवन शब्दबद्ध करावे तसेच २३ सप्टेंबर १९४७ रोजी श्रीरामपूर नगरपरिषद स्थापन झाली.आपण या शहरात वास्तव्य करतो तो ताजा इतिहास पुढील पिढीसाठी आपल्या आत्मकथनातून शब्दबद्ध करावा अशी अपेक्षा व्यक्त करून असा देखणा प्रकाशन सोहळा करून पुस्तकप्रेमाचा आनंद दिला त्याबद्दल भालेराव परिवाराचे कौतुक केले.डॉ.शिरीष लांडगे यांनी डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या गड, किल्ले भ्रमंती आणि स्नेहसोबतीचा हा प्रवास वाचनीय असल्याचे सांगितले, अध्यक्ष डॉ.बबनराव आदिक यांनी डॉ. भालेराव यांचे कौतुक केले. त्यांच्या कन्यारत्न डॉ.सोनल भालेराव यांनी या पुस्तकनिर्मितीत दिलेले योगदान याबद्दल कौतुक केले.या कार्यक्रमास माजी प्राचार्य टी.ई.शेळके,प्राचार्य शंकरराव अनारसे, डॉ.दिलीप पडघन, डॉ.सिंधूताई पडघन, सुखदेव सुकळे, किशोर गाढे (गुरुजी), संगीता फासाटे, प्रा.मंजिरी सोमाणी, प्रा.शिवाजीराव बारगळ,सौ.भाग्यश्री बडे,पाराजी पटारे, लक्ष्मणराव कदम (गुरुजी), बंडू पटारे,लक्ष्मणराव भालसिंग, पांडुरंग मगर, गणेश जाधव, रवींद्र तनपुरे, रतिलाल राजळे, रोहिदास पटारे, डॉ.मदन सोमाणी, डॉ. एन.बी.तुपे, डॉ.पराग तुपे, डॉ.गणेश जोशी, डॉ. सुरेखा जोशी, डॉ.अजित देशपांडे, डॉ. सरिता देशपांडे, डॉ. अनुजा टिळेकर, डॉ.गाडेकर, डॉ. कबाडी, डॉ.भळगट, शिरीष सूर्यवंशी, सन्मित्र व्हॉलीबॉल क्लबचे सहकारी, गुडमॉर्निंग क्लब श्रीरामपूरचे मित्रमंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.
या सर्वांनी डॉ. श्रीकांत भालेराव यांचा सत्कार केला.डॉ.दिलीप शिरसाठ यांनी ‘आनंदवारी ‘पुस्तकाचा परिचय करून दिला.सूत्रसंचालन शकील बागवान यांनी केले तर नानासाहेब डंबीर यांनी आभार मानले.