Home बुलडाणा नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील 2कोटी 23 लाखांचे अनुदान जमा...

नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील 2कोटी 23 लाखांचे अनुदान जमा ,

518

 

 

नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर यांची माहिती सिंदखेड राजा

भगवानराव साळवे

सिंदखेडराजा ,

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खडकपूर्णा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या साठी नदीकाठच्या गावातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान अर्थसहाय्य शासनाने मंजूर केले असून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील 6 हजार946 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 कोटी 23 लाख 29 हजार 280 रुपयाचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यां थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे
सिंदखेड राजा तालुक्यात 27 आणि 28 व 29 सप्टेंबरला सतत मोठा पाऊस झाला होता त्यामुळे खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते याची दखल घेत तहसीलदार सुनील सावंत यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अर्थसहाय्य मदतीची मागणी केली होती त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यासाठी सुमारे 7 कोटी 18 लाख26 हजार 480 रुपयांचा निधी मिळाला होता शासनाने ठरलेल्या निर्देशानुसार वाढीव दराने प्रतिहेक्‍टरी जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार सदर अनुदान पहिल्या तब्येत 75% आणि दुसरा टप्प्यात 25% असे दोन टप्प्यात अनुदान देण्याचे शासनाने निर्देश दिले त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 4 कोटी 94 लाख 97 हजार 200 रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील 6 हजार 946 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर 2 कोटी 23 लाख 29 हजार 280 रुपये अनुदान चांगेफळ ,बारलिंगा, केशव शिवणी, साठेगाव ,दुसरबीड ,हिवरखेड पूर्णा, निमगाव वायाळ ,तढेगाव, ताडशिवनी ,पिंपळगाव कुडा, जऊळका, रुम्हणा, लिंगा भाग 2 ,देवखेड, सोयंदेव, राहेरी बुद्रुक, राहुरी खुर्द या 17 गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले सदर कारवाई निवासी नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर, महसूल सहाय्यक एच आर बागुल यांनी तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहेत त्यामुळे आस्मानी संकटातून बाधित शेतकऱ्यांना थोडाफार पैसा मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे