Home बुलडाणा वाह रे काका सख्ख्या पुतनिवरच केला अत्याचार ,

वाह रे काका सख्ख्या पुतनिवरच केला अत्याचार ,

478

 

16 वर्षीय तरुणी चार महिन्याची गर्भवती

अमीन शाह ,

बुलडाणा, : काकांकडे आश्रयासाठी राहणाऱ्या एका 16 वर्षीय पुतणीला काकाच्या वासनेचा शिकार व्हावे लागले. चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्या लैंगिक शोषणाची घटना समोर आली आहे. बुलडाणा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील झोपडपट्टी भागातील ही घटना काका-पुतणीच्या पिता-पुत्री समान नात्याला काळिमा फासून गेली. या तरुणीची आई मागील 15 दिवसांपासून मुंबईला कामानिमित्त गेली होती. जातांना तिने मुलीला काकाकडे ठेवले. परत आल्यानंतर तिने मुलीला सोबत मुंबईला नेले. त्याठिकाणी आपली मुलगी गर्भवती असल्याचे तिला कळले. जेव्हा तिने या कृत्याबाबत मुलीला जाब विचारला तेव्हा तिने काकाचे नाव सांगितले. पिडीत तरुणीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून मुलीच्या काकाविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी काका सतीश  (वय 20 वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. पिडीत तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपास अधिकारी पीएसआय श्री शिंदे यांनी सांगितले की, घटना एप्रिल महिन्यातील आहे. आईने मुलीला मोठ्या काकांकडे सोडले होते. तिथेच आरोपी सतीश (छोटा काका) राहत होता . त्यानेच तरुणीच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप पीडितेच्या आईने लावला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.