Home बुलडाणा स्वर्गीय ‘त्या’ दोन कार्यकर्त्यांच्या घरी दीपावली झालीच नाही

स्वर्गीय ‘त्या’ दोन कार्यकर्त्यांच्या घरी दीपावली झालीच नाही

347

 कार्यकर्त्यांकडून वहिनीसाहेब नात्याच्या बहिणीला भाऊबीजेची दीपावली फराळ व साडी भेट…

जालना – लक्ष्मण बिलोरे

सामाजिक कार्यात आयुष्य खर्ची घालणारे व प्रत्येक कामात समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रमक लढा देणारे शिरोळ तालुक्यातील लढाऊ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय प्रसाद धर्माधिकारी (शिरोळ) व स्वर्गीय हरिश्चंद्र कांबळे (दानवाड ) यांचा कोरोना काळात मृत्यू झाला, या दोन्ही कुटुंबीयांची ही पहिली दिवाळी !
आनंद ,उत्साह देणाऱ्या या दिवाळीत कुटुंब प्रमुख ,कर्ता पुरुष घरी नाही, याचे दुःख मनाशी बाळगून त्या कुटुंबाच्या घरात दिवाळी साजरी झाली नाही, त्यामुळे शिरोळ व परिसरातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने दिवाळी पाडवा व भाऊबीज यानिमित्ताने नवे दानवाड येथील कै हरिश्चंद्र कांबळे यांची पत्नी श्रीमती वंदना ( सरपंच) तर शिरोळ येथील कै प्रसाद धर्माधिकारी यांच्या पत्नी श्रीमती जयश्री धर्माधिकारी (नगरसेविका) या परिवारांना भेट देऊन दीपावली फराळासोबत भाऊबीज साडी भेट दिली,,,,,,,,
अचानक दिवाळी सणात घरी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून ‘त्या ‘ भगिनी भावूक झाल्या,,,! हा क्षण पहाताच डोळ्यात अश्रू,,,, आठवणींचा महासागर दाटला,,,,,आणि बऱ्याच आठवणीने त्या भगिनी सोबत कार्यकर्त्यांनी मन मोकळे केले, सच्चा प्रामाणिक व धाडसी त्या दोन्ही दिवंगत कार्यकर्त्यां च्या आठवणीत काही काळ आम्ही अबोलच झालो,,,,
रक्ताच्या नात्यापलीकडेही ऋणानुबंध जपलेल्या चळवळीमधील कार्यकर्त्यांनी
‘त्या’ दिवंगत दोन्ही मित्रांच्या कुटुंबीयांना दिलासा देत बहिणीच्या भेटीत कार्यकर्तारूपी भाऊ, तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही चिंता करू नका, परिवाराच्या कोणत्याही संकटात हाक द्या,,,आम्ही भाऊ तुमच्या सोबत असू ! असा शब्द देऊन आम्ही माघारी फिरलो,,,,,,
पण, समाजातील प्रश्नावर कार्यकर्ता म्हणून काम करताना या दोन्ही दिवंगत सामाजिक कार्यकर्त्यांची उणीव भासते, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, त्यामुळेच दीपावली पाढवा भाऊबीजनिमित्त माणूस आणि माणुसकीमधील हा सस्नेह
जिव्हाळा जपला,,,,,यावेळी शिरोळ येथील प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दगडू माने, पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, राजेंद्र प्रधान ,विश्वास कांबळे ,शिरोळ शिवगोंडा पाटील – टोपाई यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ, चिदानंद कांबळे, सचेतन बनसोडे, पत्रकार अविनाश सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.