
कर्जत:जयेश जाधव
राष्ट्रवादी कॉग्रेस कर्जत शहर यांच्या वतीने आज कर्जतमध्ये केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गँस दरवाढ, रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ तसेच चक्रीवादळात न झालेली मदत केंद्र सरकार महाराष्ट्रावर करीत असलेल्या अन्यायाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत शहराच्या वतीने आज कर्जत बाजारपेठेत टिळक चौकात कोरोनाचा सामाजिक अंतर पालन करिच्या केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणा बाजी करण्यात आली
‘देश मे मोदी है – तो महंगाई है. ‘कोरोनाने वाचलो अन महागाई ने मेलो’ अशा घोषणा व नारेबाजीतून केंद्र व मोदी सरकारचा निषेध व निदर्शने करण्यात आले. चुलीत घाला तुमची प्रधानमंत्री उज्वला योजना असा नाराजीचा सूरही यावेळी महिलांनी काढला असून जीवनावश्यक वस्तूंचे दिवसेंदिवस भाव वाढ होत असल्याने व मुख्यतः गॅस दरवाढ तर अक्षरश: आकाशाला भिडत असल्याने घरगुती आर्थिक बजेट कोलमडत आहे यासाठी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड ,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शरद लाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, उमेश गायकवाड,भारती पालकर ,कर्जत शहराध्यक्ष सोमनाथ पालकर, महेंद्र लाड,माजी नगराध्यक्ष राजेश लाड,नगरसेविका मधुरा चंदन , कृष्णा जाधव, नंदकुमार मांडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते











































