Home विदर्भ कोरोनामुळे बंद असलेल्या शाळेचा आवार बनला मद्यपींचा अड्डा

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळेचा आवार बनला मद्यपींचा अड्डा

324

पवित्र विद्येचे मंदीरच समाजकंटकांडुन होत आहे अपवित्र

ईकबाल शेख

तळेगांव (शा.पं.) : – शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. परंतु गावातीलच काहि व्यसनी युवकांकडुन या पवित्र विद्येच्या मंदिराला मद्यपींचा अड्डा बनवुन अपवित्र बनविण्यात येत आहे.

मागील वर्षी संपुर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातल्याने संपुर्ण शाळा मागील वर्षीपासुन बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर याही वर्षी कोरोनाने राज्यात धुमाकुळ घातल्याने ब्रेक दि चैन अंतर्गत लाॅकडाउन करण्यात आले आहे त्यामुळे कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांच्या इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग होऊ लागला आहे. येथील जुन्या वस्तीतील गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालय आवारात असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या अवारात मद्यपींनी अक्षरश: धुमाकुळ घातला असुन त्या शाळेच्या अावारात सर्वत्र गावठी दारुच्या प्लास्टक पन्न्या, प्लास्टिकचे ग्लास, काहि मद्याच्या रिकाम्या बाटल्या, चिवड्याचे पाॅकीट, सिगरेटचे पाॅकीट जागो जागी माेठ्या प्रमाणात पडलेले दिसुन येत आहे.त्या पडल्या असलेल्या साहित्यावरुन तिथे बर्‍याच दिवसापासुन मद्यपीं शाैकीनांचा अड्डा असावा हे निदर्शनात येते. तेव्हा याकडे सबंधीत विभागातील व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

बाॅक्स.

गावात असलेल्या काळोखाचा युवक घेतात फायदा.

तळेगाव येथील दोन महिण्यापासुन गावातील पथदिवे बंद आहे तर कोरोनामुळे सध्या संचारबंदी सुद्धा आहे.त्यामुळे काहि युवकांचे टोळके काळोखाचा फायदा घेत शाळेच्या आवारात बसुन  मद्यप्राशनासह आणखी काहि अनैतिक कृत्य करीत असल्याची गावात चांगलीच चर्चा आहे.