Home मराठवाडा लाॅकडाउन मध्येही बेवडे’ झिंगाट ‘ देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

लाॅकडाउन मध्येही बेवडे’ झिंगाट ‘ देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

291
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

कोरोना महामारिच्या काळात एक वेळ जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होवू शकतो मात्र बेवड्यांना दारू मात्र सहज उपलब्ध होत आहे.पोलिसांच्या डोळ्यात धुळ झोकून अंबड-घनसावंगी तालुक्यातील गावांमध्ये दारू विक्री केली जात आहे.गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस मात्र कोरोना महामारिच्या संकटातही अवैध धंदे वाल्यांवर लक्ष ठेवून आहेत.
अंबड तालुक्यातील साष्ठ पिंपळगाव शिवारात देशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी मोटारसायकलवर देशी दारूचे बॉक्स घेऊन जात असताना दि.२० मे रोजी सकाळी ६ वाजता गोंदी पोलिसांनी दोन पंचांना बोलवून अचानक छापा टाकत कारवाई केली.

याबाबत माहिती अशी की,साष्ठ पिंपळगाव शिवारात होंडा कंपनीच्या सुपर स्पेलेंडर या मोटरसायकलवर राजेंद्र चंदन साबळे,रा.साष्ट पिंपळगाव हा देशी दारूच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या देशी दारूच्या बॉक्समध्ये घेऊन जात होता.तेव्हा याची गुप्त बातमी पोलिसांना कळताच त्यांनी दोन पंचांना बोलावून त्याठिकाणी जाऊन अचानक छापा मारला.

यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १८० मिलिच्या ९६ बाटल्या व एक होंडा कंपनीची सुपर स्पेलेंडर असा एकूण २४ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.सदर आरोपीस देशी दारू माल कोठून आणली असे विचारले असता त्याने ही देशी दारू संदीप सतिश जैस्वाल यांचे देशी दुकानातून आणली असून त्यांनी सदर दारूचे बॉक्स पार्सल करण्यासाठी मोटार सायकल दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग अंबड सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.आर.बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक जी.के.कौळासे,पोलीस अंमलदार अशोक कावळे,संदीप कुटे, होमगार्ड राठोड,कणके यांनी केली आहे.