Home बुलडाणा गळफास घेऊन आत्महत्या…!

गळफास घेऊन आत्महत्या…!

744

हनिफ शेख

अंढेरा , ( प्रतिनिधी ) –  येथील रहिवासी परसराम विठोबा शिंदे वय 62 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 31 मार्च रोज बुधवारी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. सदर घटनेची फिर्याद मृतक परशराम शिंदे यांचा मुलगा गजानन शिंदे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये दिली असून त्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यात येणाऱ्या पाडळी शिंदे येथील रहिवासी परसराम विठोबा शिंदे यांच्या कडे पाडळी शिंदे येथिल शिवारात मुलाच्या नावाने शेतीअसून ते अल्प भूधारक कटूंब असून परशराम शिंदे हे नेहमीच सततच्या नापिकी ने वैफल्यग्रस्त मनस्थितीत राहत असत कुठल्याही बँकेचे कर्ज त्यांनी घेतले नसल्याची माहिती आहे त्यातच त्यांनी आज 31मार्च रोजी पत्नी व मुलगा काम करण्यासाठी शेतात गेले असल्याचे पाहून परशराम शिंदे यांनी राहत्या घरी आंगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना त्यांच्या पत्नी शेतातून घरी आल्यावर त्यांना त्यांचे पती परशराम शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनतर ही घटना उघडकीस आली. असून मृतक परशराम शिंदे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली ,भाऊ, असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ,यावेळी त्यांच्या सोबत पोहेका निवृत्ती पोफळे, राजू चौधरी व इतर कर्मचारी उपस्थित झाले होते.घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार विकास देशमुख हे करीत आहे .पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून उत्तरीय तपासणी करता मृतदेह देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता व उत्तरीय तपासणी करण्यात आल्या नंतर त्यांच्यावर मूळ गावी पाडळी शिंदे येथील स्मशानभूमीत1एप्रिल रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.