Home बुलडाणा कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले . . आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले . . आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

199

कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले .
. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
——————————————————

हनीफ शेख
अंढेरा  : – कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले ही घटना २० डिसेंबर रोजी डोढरा येथे घडली .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोढरा येथील १७ वर्षीय कुमारीकेला अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेला गणेश शिवंशकर गायकवाड याने कुमारीकेला लग्नाचे आमीष दाखवून पळुन नेले . अशी तक्रार मुलीचे वडील ज्ञानेश्वर शेषराव नाडे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली . या तक्रारीवरून ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार साखरे यांनी आरोपी गणेश शिवंशंकर गायकवाड यांच्या विरुद्ध अप न ४१२/२० कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास बिट अंमलदार मोरशिंग राठोड यांच्याकडे सोपविला आहे.