Home नांदेड सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने इच्छुकांचे स्वप्नभंग , संभ्रमावस्था कायम 

सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने इच्छुकांचे स्वप्नभंग , संभ्रमावस्था कायम 

86
0

नांदेड (प्रशांत बारादे ) : आरक्षणानंतर सरपंच पदावर डोळा ठेवून मोर्चेबांधणी करणाऱ्यांना शासनाने सरपंचपदाचे आरक्षण रद्द केल्याने स्वप्नभंग झाले आहे आता निवडणूक नंतर सोडत प्रक्रिया केली जाणार असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५जानेवारी रोजी मतदान होणार आहे .राज्य शासनाच्या आदेशानुसार सरपंच पद आरक्षण निवडणूक नंतर होणार आहे व आचारसंहिता लागू करण्यात आली आहे .निवडणूक प्रशासनाकडून प्रभागरचना मतदारयाद्या ,हरकती व सुनावणी आदि कामे गावांतील सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले होते .आरक्षणामुळे ज्यांची संधी हुकली होती ते आता आनंदात आहेत मात्र सोयीचे आरक्षण मिळालेल्या गावातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे . .सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणूक लढवण्याचा तयारीत असलेल्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे .