Home बुलडाणा
235

लहान चिमुकल्यास हिटर चे चटके देऊन केले जखमी ,

गुन्हा दाखल ,

संतापजनक घटना ,

अमीन शाह

बुलडाणा ,

एखादंया माथेफिरू माणसाच्या डोक्यात राग अनावर झाला तर तो कूरतेची परिसीमा गाठतो
. वडिलांशी झालेल्या व्यवहारात नुकसान झाल्याचा राग असलेल्या माथेफिरूने एका चिमुकल्याला घरात बोलावून इलेक्ट्रिक हिटरचे चटके दिले . तसेच त्याच्या आईला ही चटका दिला चिमुकला यात जखमी झाला असून त्याच्या सर्वांगावर या चटक्यांमुळे जखमा झाल्या , त्याच्यावर उपचार केले जात आहेत . या प्रकरणी चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे . या संदर्भात शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार येथील सुरेश चिंचोलकर यांनी महादेव सीताराम लांबे यांची जागा त्यांच्याकडून कायदेशीर खरेदी करून घेतली व सर्व वयव्हर केला होता मात्र आपल्या जागेचे पैसे कमी मिळाले असा राग लांबे यांच्या मनात होता हेच राग मनात ठेवून लबे याने 1 सप्टेंबर रोजी सुरेश चिंचोलकर यांचा 4 वर्षीय दर्शन नावाचा मुलगा लांबेच्या घरासमोर खेळत असताना त्याने दर्शनला घरी बोलावले . त्याच्या छाती , मांडीसह पाठीवर इलेक्ट्रिक हीटर चटके देऊन गंभीररित्या जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला . दरम्यान , चिमुकल्याची आई घटनास्थळी मुलास सोडवण्यास गेली असता लांबे याने तिलाही इलेक्ट्रिक हीटरचे चटके दिले . चिंचोलकार यांनी या प्रकरणी पोलिसांत लांबेविरुद्ध तक्रार दिली असून , पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने त्याला अटक केली आहे . तपास पोलिस निरीक्षक श्री . टाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहे .घडलेल्या घटने मूळे शहरात संताप वयकत केला जात आहे ,