Home बुलडाणा धावत्या ऑटो रिक्षात विवाहितेचा विनयभंग ,  “आरोपीस अटक”

धावत्या ऑटो रिक्षात विवाहितेचा विनयभंग ,  “आरोपीस अटक”

448

अमीन शाह

बुलडाणा – मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथे धावत्या ऑटोत एका विवाहितेची छेड काढल्या ची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार एक 32 वर्षीय विवाहीत महिला मोताळा येथून नहेरूनगर येथे आपल्या पती सह जात होती पीडित महिलेचा पती चालकाच्या बाजू बसला होता तर विवाहित महिला ही मधल्या सीटवर बसली होती मागच्या सीटवर अनिल धुरंदर 37 हा बसला होता चालत्या ऑटोत त्याने महिलेची छेड काढली अचानक झालेल्या या प्रकाराने विवाहिता फार घाबरून गेली त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला हे पाहून ऑटो चालकाने ऑटो थांबविला असता अनिल उडी मारून पळून गेला या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून घडलेल्या घटनेमूळे परिसरात संताप वयकत केला जात आहे .